गेल्या वर्षीचा कमी पाऊस, उन्हाळ्यातील पाणी टंचाई आणि जनावरांकरिता वापरलेला ऊस, यामुळे जिल्ह्यातील अनेक कारखान्यांना पुरेशा प्रमाणात ऊस उपलब्ध होत, नसल्याची स्थिती आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी कारखाने ऊस टंचाईमुळे अडचणीत सापडले आहेत. चालू वर्षी उसाचे क्षेत्र घटल्याने साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस मिळविणे मोठे आव्हान बनले आहे. गाळपाची सरासरी गाठण्यासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांना झगडावे लागण्याची चिन्हे आहेत.
10 वर्षात हे 10 Apps झाले सर्वाधिक डाऊनलोड
जिल्ह्यात गेल्या वर्षी १२०.८२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. चालू वर्षी उसाच्या टंचाईमुळे ते सुमारे ८२ लाख मेट्रिक टन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ३५ लाख ८२ हजार मेट्रिक टनाने गाळप कमी होण्याचा अंदाज आहे. पावसामुळे बहुतांशी पीक हातचे गेले आहे. काही ठिकाणचा ऊस गाळपायोग्य नाही. पावसामुळे नवीन ऊस लागवडी फार झालेल्या नसल्याने त्याचा विपरीत परिणाम क्षेत्र घटण्यावर झाला आहे.
जाणून घ्या मखाना खाण्याचे फायदे
जिल्ह्यात साखर पंढरी म्हणून ओळख असलेल्या बारामती, दौड, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील साखर कारखान्यांना गेटकेन ऊस घेतल्याशिवाय त्याचा गळीत हंगाम पूर्ण होऊ शकत नसल्याची स्थिती आहे. दरवर्षी थोड्याफार फरकाने अशी स्थिती असते. परंतु, यंदा यांचे प्रमाण अधिक असणार आहे.
‘या’ मोबाईलमध्ये चालणार नाही व्हॉट्सअॅप https://t.co/H9sctHEpCI
— KrushiNama (@krushinama) January 2, 2020