जनावरांना रोगांपासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण महत्वाचे

जनावरांना आजार झाल्यास, अपुऱ्या पशुवैद्यकीय सेवेमुळे, किंवा नक्की निदान न झाल्यामुळे जनावरे दगावतात व पशुपालकांना उत्पादन, जनावर व औषधोपचारावरील खर्च असे एकूण मोठ्या आर्थिक संकटाला समोरे जावे लागते. त्यामुळे जनावरांना रोगांपासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण करणे अतिशय आवश्यक ठरते.

आवळा लागवड

जनावरांना नियमित लसीकरण केल्यास संसर्गजन्य आजाराचे प्रमाण कमी होऊन जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकते. दुग्धव्यवसायात दुधाळ जनावरांना निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जनावरांना विविध प्रकारच्या जिवाणू व विषाणूपासून संसर्गजन्य रोग होतात. या रोगांमुळे दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन घटते, जनावरांची कार्य करण्याची क्षमता कमी होते व त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनाची प्रत खालावते.

डाळिंबाचे बाजारभाव कोसळले

त्यामुळे व्यवसाय तोट्यात जाऊ शकतो. जनावरांमध्ये विशिष्ट रोगांसाठी लस उपलब्ध आहे आणि अशाप्रकारची लस दिल्यानंतर रोगांचा प्रादुर्भाव टाळणे शक्य होते. लसीकरणामुळे जनावरांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते, मात्र लसीकरणापासून मिळणारी रोगप्रतिकार शक्ती विशिष्ट कालावधीसाठी असते, त्यामुळे पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार लसीकरण करावे.