शेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि कमवा लाखो रुपये

कोरफडीची शेती जमीन नांगरून बेड तयार करून घ्यावेत. दोन बेडच्या मधील अंतर हे २-२.५ फूट असावे. त्यानंतर या पिकासाठी नर्सरी किंवा इतर शेतकऱ्यांकडे रोपे मिळतात ती घेऊन साधारण १ फुटांवर याची लागवड करावी.  त्यानंतर गरजेनुसार पाणी द्यावे. एका एकरमध्ये जवळपास १०,००० रोपे लावता येतात. काही दिवसांनंतर पीक जोमदार येईल अशावेळी पिकात इतर गवत वाढू नये, याची काळजी घ्यावी. तसेच एकदा लागवड केल्यानंतर ५ वर्षांपर्यंत या रोपाचे आयुर्मान असते.

महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी येत्या २४ तासात मुसळधार पाऊस होणार

कोरफडीची लागवड करण्यासाठी हलकी जमीन असणे गरजेचे आहे. पाण्याची उपलब्धता जरी कमी असली तरी कोरपडचे उत्पन्न आपण घेऊ शकतो.  कोरपडीची लागवड करताना लवकर पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. कोणत्याही ऋतमध्ये कोरफड लावता येते परंतु उन्हाळ्याचा काळ यासाठी उत्तम असतो.

कर्जवाटप बाबत धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय

कोरपडीच्या पानांचे वजन ५००-८०० ग्रॅम झाल्यास आपण काढणी करून याची विक्री करू शकतो. यासाठी तुम्ही काही औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांशी करणार करु शकता. तसेच घरीच ज्यूस बनवून विकू शकता. जर तुम्ही कंपन्यांशी करार केला असेल तर ते तुम्हाला ४-७ रुपयांपर्यंत भाव देतात. तसेच एका झाडाला ३-४ किलो पाने असतात. म्हणजे एक झाड आपल्याला २० रुपये देऊ शकते. म्हणजे १०,००० झाडांपासून आपल्याला २ लाख रुपांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. यासाठी खर्च ५०-६० हजार रुपये येत असतो.

महत्वाच्या बातम्या –

गवती चहा पिण्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

शेत जमीन खरेदी करताना ‘ही’ काळजी घ्यावी