कांद्याच्या वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने घेतला हा निर्णय

कांद्याच्या वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी 1 लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. आयात कांदा देशभरात पोचवण्याच्या सूचना नाफेडला देण्यात आल्याचं अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री राम विलास पासवान यांनी काल सांगितलं.

दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटकात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र नेमकी कांद्याची काढणी सुरू असताना दोन्ही राज्यात जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे जमीनीतील कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. दोन्ही ठिकाणी अद्यापही पाऊस थांबला नसल्याने नवीक कांद्याची आवक सुरू होणे अशक्य आहे.

परतीच्या पावसाचा कालावधी लांबल्याने नव्या कांद्याचे नुकसान झाले आहे. कांदा जमिनीतच सडत असल्याने महिनाअखरेरपर्यंत नवीन कांद्याची आवक अशक्य आहे. त्यामुळेच आणखी महिनाभर कांद्याचे दर तेजीत राहणार आहेत. त्यानंतर मात्र काही प्रमाणात दर कमी होणार असल्याचा अंदाज पुण्यातील व्यापारी रितेश पोमण यांनी व्यक्त केला.

सद्य:स्थितीत जी आवक होत आहे. तो भिजलेला कांदा आहे. त्यामुळे त्याचा दर्जा खालावलेला आहे. तरी मागणी अधिक असल्याने घाऊक बाजारात 10 किलो कांद्याला 450 ते 520 रूपये दर मिळत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवीक कांद्याची आवक सुरू होईल. बाजारात आवक वाढल्यास दरातही घट होणार असल्याचेही पोमण यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय पार्थ स्वत: घेईल – अजित पवार

शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदतीसाठी स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन

मालाडमधील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री

अंबड तालुक्यतील शेतकऱ्याने बाजारी, सोयाबीन टाकले जाळून