अंबड तालुक्यातील मार्डी शिराढोन वाडी परिसरात शेतकरी जुबेर शेख यांनी आपल्या शेतातील सोंगनी व कापणी केलेले पीक वैतागुन आज सकाळी शेतात जाळून टाकले आहे.
नसर्गिक आपत्ती, रोगराई, दुष्काळाचे सावट तसेच परतीच्या पावसाने होत्याचे नवते झाले आहे. सोयाबीनला अक्षरशा कोंब फुटले आले. बाजीरीची नासाडी झाली आहे. केलेला खर्चही वसूल झाला नाही.
शेतीचे गणित अखेर विस्कटले आहे. नुकसान भरपाईचे पंचनामे होणार केंव्हा आणि शासनाची मदत मिळणार केंव्हा बँकांकडून पीक कर्ज देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे.कर्ज माफीचे के झाले आहे हे कळायला मार्ग नाही.एकीकडे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तर राज्यात अजूनही सरकार स्थापन करण्यात आले नाही. यामुळे शेतकरी चहोबाजूने भरडला जात आहे.
पीक विमा मिळण्यासाठी पुन्हा एकदा कागदपत्रे सादर करण्याचे सांगण्यात आले आहे. अगोदरच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वेळ व पैसा खर्च करण्याची वेळ आली आहे. शेतकरी कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळाने भरडला जात आहे. एकंदरीत शेतकरी शेतीचे उत्पन्नाचे समिरण जुळत नसल्याने पुरता भयभीत झाला आहे. मदतीचा हात शासनाने देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची खरी काळाची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या –
दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रीतम मुंडे धावल्या ; केंद्र सरकारकडे मागितली मदत
आदिवासी महामंडळाचा 1 कोटी 34 लाख रुपयांचा तांदूळ घोटाळा
परदेशातून कांदा आयात करणे हे सरकारचे चुकीचे धोरण-जितेंद्र आव्हाड