शेतकऱ्यांचे हाल ; कृषी कार्यालयाचा परमीट देण्यास नकार

नांदेड – दुष्काळामुळे विस्कटलेली आर्थिक घडी, कर्जाचा डोंगर यामुळे शेतकरी यंदाही बेजार झाले आहेत. आर्थिक घडी सावरण्यासाठी काढलेले कर्ज व सावकारी ओझ्याखाली दबलेला शेतकरी आत्महत्याचा मार्ग निवडत असल्याचे चित्र आहे. एकीकडे सरकार शेकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस पाडत असले तरी त्याची अमंलबजावणी होताना दिसत नाही आहे.

मान्सून जवळ येताच शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली. शेती पेरणीसाठी सज्ज ठेवली आहेत. कृषी दुकानात बी-बियाणे दाखल झाले असले तरीही महामंडळाकडून एक महिन्यापूर्वी दाखल सबसीडीच्या बियाणांकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. कृषी कार्यालय मात्र परमीट देण्यास नकार देत असल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. सबीसीडीचे परमीट महामंडळकडून अजून आले नाहीत, असे  उत्तर शेतकऱ्यांना दिले जात आहे. यामध्ये कृषी केंद्र चालक, महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये ‘मिलीभगत’ असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे.

महिनाभरापूर्वीच महामंडळाचे बियाणे दाखल झालेले असताना परमीट कसे काय आले नाही? असा सवाल शेतकरी करीत आहेत. परमीट नसल्याचे सांगून काही दुकानदार बियाणांची चढ्या दराने विक्री करीत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे कृषी केंद्रातील खते, बी-बियाणे, औषधांचे सॅपल तपासण्याची गरज शेतकरी व्यक्त करीत आहेत.

शेतकऱ्यांना सबसीडीचा लाभ मिळण्यासाठी महामंडळाच्या वतीने कृषी कार्यालयात परमीट बुक पाठवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे  होत आहे.

अर्थसंकल्प : कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी ६,४१० कोटी रुपयांची तरतूद

पंतप्रधान नरेंद्र मोदींना फक्त थापा मारता येतात-उद्धव ठाकरे