जाणून घ्या राजगिऱ्याचे आरोग्यदायी फायदे

‘राजगिरा’ आपल्याला नवरात्री, एकादशी अशा उपवासांना आठवतो. पण एवढा मर्यादीत त्याचा ऊपयोग आहे का??? नक्कीच नाही. राजगिरा ही अत्यंत गुणकारी वनस्पती आहे. राजगीऱ्यास रामदाना,अमरनाथ म्हणुनही ओळखले जाते. अमेरीकेतून भारतात आलेली ही वनस्पती आहे. धान्यांच्या तुलनेत राजगिऱ्यामध्ये कॅल्शिअम हे तिपटीने अधिक असते. त्यामुळे हाडांना मजबुती मिळते. राजगिऱ्यात विशेषतः प्रथिने, तंतुमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, खनिज द्रव्ये यांचे … Read more

बाजार समित्यांमध्ये मुगाच्या दरात वाढ

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतकरी खरीपाच्या पेरणीची घाई करीत आहेत. अशात बाजार समित्यांमध्ये मुगाचे दर वाढून ६ हजार रुपये प्रति क्विंटलच्या वर झाले आहेत. बाजारात सध्या उन्हाळी मुगाची खरेदी होत असली तरी, पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव करणाऱ्या शेतकऱ्यांना या दरवाढीमुळे दिलासा मिळाला आहे. शासनाने गतवर्षीच्या हंगामात मुगाला … Read more

बी- बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी

जालना : मागील वर्षी पाऊस नसल्याने शेतक-यांच्या हातून खरीप व रबीचे पीक गेले आहे. यामुळे यंदा वेळेवर पाऊस पडेलं. पीक जोमाने येईल. या आशेवर शेतकरी उन्हाळ्यातच शेतीच्या कामाल लागला होता. त्यामुळे कृषी विभागातर्फे वेळेवर शेतक-यांनी बी- बियाणे मिळावे, यासाठी परिपूर्ण तयारी करण्यात आली होती. दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना मृग नक्षत्रात पाऊस बरसेल आणि पेरणीचा प्रश्न … Read more

आवक कमी झाल्याने पालेभाज्या कडाडल्या

गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने सर्वच पिकांवर त्याचा परिणाम झाला असून कडधान्याची आवक घटल्याने त्यांचेही भाव वाढत गेले. त्यात यंदाही जून महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला असला तरी पाऊस नसल्याने व उन्हाच्या झळा कायम असल्याने भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम होत आहे. भाजीपाल्याची आवक दिवसेंदिवस घटत असून त्यांचे भाव वाढत आहे. पालेभाज्यांचे भाव सर्वाधिक वाढत असून मेथीची जुडी … Read more

शेतकऱ्यांचे हाल ; कर्जमाफी नाही, पीक कर्जही मिळेना!

अकोला : दुष्काळी परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांसमोर खरीप पेरणीचा खर्च भागविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळी परिस्थितीत जवळ पैसा नाही आणि पीक कर्ज मिळत नाही, अशा परिस्थितीत तोंडावर आलेल्या खरीप पेरणीचा खर्च भागविणार तरी कसा, असा प्रश्न अकोला जिल्ह्यातील थकबाकीदार ९७ शेतकऱ्यांसमोर  निर्माण झाला आहे. कर्जमाफी मिळाली नाही आणि पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले … Read more

कृषी विभागाने केली राज्यातील बॅंकांची चांगलीच कानउघाडणी

राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, “पीकविम्याच्या कामाबाबत काही बॅंका अतिशय बेफिकिरीने काम करतात. मात्र रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशाशिवाय कोणालाही जुमानायचेच नाही, असे धोरण काही बॅंकांचे आहे. आम्ही सूचना देऊनही उपयोग होत नव्हता; पण आता कृषी विभागानेच कानउघाडणी केल्याने बॅंकांना दखल घ्यावीच लागेल.” प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना बॅंकांकडून होणाऱ्या हलगर्जीपणाबाबत कृषी विभागाने राज्यातील बॅंकांची चांगलीच … Read more

जांभूळ खाल्याने होणारे फायदे ….

उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीस काळसर जांभळ्या रंगाच्या जांभळाचे घड झाडाला लगडलेले दिसतात. निसर्गाने निर्माण केलेले हे फळ शरीरामध्ये अमृतासमान कार्य करते. जांभूळ हे पाचक आहे. तसेच ते अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळीच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो. ग्रीष्म ऋतूत आंबा हे अमृतफळ असते तर वर्षांऋतूत जांभूळ हे अमृतफळ असते. … Read more

आले (आद्रक) लागवडीचे तंत्र

प्रस्‍तावना आले या वनस्पतीची लागवड पौराणिक काळापासून केली जाते. आल्यातील विशिष्ट चव व स्वाद यामुळे दररोजच्या जेवणातील मसाल्यात आल्याचे महत्वाचे स्थान आहे. ओले आले, प्रक्रिया करून टिकवलेले आले अथवा सुंठ अशा स्वरुपात आल्याचा उपयोग करतात. जमिनीतील आल्याच्या खोडाचा उपयोग मसाल्यासाठी करतात. हवामान व जमीन आल्याला उष्ण व दमट हवामान मानवते. थंडीमुळे आल्याची पानेवाढ थांबते व … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; आता शेततळ्यासाठी ९५ हजार रुपये अनुदान

राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेची महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेशी सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे राज्य शासनाचे 50 हजार रुपये अनुदान आणि मनरेगातून 45 हजार असे एकूण 95 हजार रुपयांचे अनुदान शेततळे खोदाईसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. आतापर्यंत 1 लाख 61 हजार शेततळी पूर्ण करण्यात आली असून 2 लाख 30 हजार शेततळ्यांची आखणी करुन ठेवण्यात आली … Read more

शेतकऱ्यांचे हाल ; कृषी कार्यालयाचा परमीट देण्यास नकार

नांदेड – दुष्काळामुळे विस्कटलेली आर्थिक घडी, कर्जाचा डोंगर यामुळे शेतकरी यंदाही बेजार झाले आहेत. आर्थिक घडी सावरण्यासाठी काढलेले कर्ज व सावकारी ओझ्याखाली दबलेला शेतकरी आत्महत्याचा मार्ग निवडत असल्याचे चित्र आहे. एकीकडे सरकार शेकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस पाडत असले तरी त्याची अमंलबजावणी होताना दिसत नाही आहे. मान्सून जवळ येताच शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली. शेती पेरणीसाठी सज्ज … Read more