‘या’ जिल्ह्यातील पहिलीपासूनच्या शाळा आजपासून सुरु

औरंगाबाद – कोरोनामुळे (corona) गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या प्राथमिक शाळांची (School) दारे अखेर आजपासून (दि.२०) उघडणार असल्याने सर्वत्र शाळांची तयारी सुरू झाली आहे. याशिवाय कोविडच्या रुग्णांचा आकडा कमी झाला असला तरी कोविडचे नियम पाळूनच शाळा सुरू कराव्या लागणार आहे. तशा सूचना देखील शाळांना (School) देण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या (corona पार्श्वभूमीवर दीड वर्षापासून प्राथमिक शाळा (School) बंद होत्या. माध्यमिकच्या शाळा सुरू झाल्या. परंतु प्राथमिकच्या शाळा केव्हा उघडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. यावर १ डिसेंबरनंतर शाळा सुरू होईल असे देखील सांगितले गेले होते. परंतु कोव्हीड मुळे पुन्हा शाळा सुरू होणार नाही असे मनपाने स्पष्ट केले होते. त्यानंतर आता पुन्हा सोमवारी २० तारखेपासून शहरातील पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता शाळांनी तयारी केली असून शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावेच लागणार आहे.

विद्यार्थ्यांना मास्क लावूनच शाळेत प्रवेश

शाळा सुरू होताच पहिल्या दिवशीपासून विद्यार्थ्यांना शाळेत मास्क लावूनच प्रवेश दिला जाणार आहे. मास्क लावणे आवश्यक असून शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना थर्मल गनद्वारे तपासणी करणे, विद्यार्थ्यांना ताप, सर्दी, खोकला किंवा इतर लक्षणे आढळून आल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवून डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला जाणार आहे. याशिवाय वर्गात सुरक्षित अंतर ठेवून शाळेतील जागेनुसार विद्यार्थ्यांना बसविण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या –