‘या’ जिल्ह्यातील पहिलीपासूनच्या शाळा आजपासून सुरु

औरंगाबाद – कोरोनामुळे (corona) गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या प्राथमिक शाळांची (School) दारे अखेर आजपासून (दि.२०) उघडणार असल्याने सर्वत्र शाळांची तयारी सुरू झाली आहे. याशिवाय कोविडच्या रुग्णांचा आकडा कमी झाला असला तरी कोविडचे नियम पाळूनच शाळा सुरू कराव्या लागणार आहे. तशा सूचना देखील शाळांना (School) देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या (corona पार्श्वभूमीवर दीड वर्षापासून प्राथमिक शाळा … Read more

मंत्रिमंडळ निर्णय: पैठण येथे मोसंबीसाठी ६२ एकरावर “सिट्रस इस्टेट” होणार

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील ६२ एकर जागेवर सिट्रस इस्टेट (Citrus Estate) स्थापन करण्याची घोषणा २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यानुसार काल झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मराठवाड्यात  सुमारे ३९ हजार ३७० हेक्टर क्षेत्रावर मोसंबीचे (Mosambi) उत्पादन घेतले जाते. यामध्ये औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याचे क्षेत्र अनुक्रमे २१ … Read more

महसूल विभागांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नागरिकांना सुविधा द्याव्यात!

औरंगाबाद – महसूल (Revenue) विभागाच्या कामकाजात ‘ई ’ फेरफार सातबारा, शासकीय जमिनीचे अभिलेखे व नोंदीमध्ये अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करुन पारदर्शकपणे नागरिकांना महसूल (Revenue) विभागाने सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश अपर मुख्य सचिव नितीन करीर यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महसूल (Revenue) विभागाच्या आढावा बैठकीत दिले. या बैठकीस विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, उपायुक्त … Read more

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रांमध्ये ‘इन्क्युबेशन सेंटर’ची निर्मिती करा – सुभाष देसाई

औरंगाबाद – प्रशिक्षणार्थींना नवनवीन कल्पना घेऊन उद्योग विकसित करावयाचा असतो. उद्योग, व्यवसायासाठी त्यांना मार्गदर्शन आवश्यक असते. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रांमध्ये अशा प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करण्यात येते. त्यांचे प्रशिक्षण पार पडल्यानंतर प्रशिक्षणार्थींसमोर काही अडचणी असतात. त्या सोडविण्याचे व उद्योग उभारण्याचे मार्गदर्शन इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून होण्यास मदत होते.  त्यामुळे प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणीच जिल्हानिहाय इन्क्युबेशन सेंटरची निर्मिती करावी, अशा सूचना … Read more

मधुमेहाबाबत जागृती, शिक्षणावर भर आवश्यक – राजेश टोपे

औरंगाबाद – मधुमेह आजार आणि त्याच्या उपचाराबाबत जागृती, शिक्षणावर भर देणे आवश्यक आहे.  बालकांमध्ये प्रकार एकचा मधुमेह  आढळतो. या आजारासंबंधी आवश्यक त्याप्रमाणात सुविधा, निधी देण्याला शासनाचे प्राधान्य असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. शहरातील हनुमान टेकडी परिसरात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली उडाण संस्थेच्या वतीने जागतिक मधुमेह दिन कार्यक्रम पार पडला. यावेळी … Read more

विद्यार्थ्यांच्या हितालाच शासनाचे प्राधान्य – उदय सामंत

औरंगाबाद – विद्यार्थ्यांच्या विकासाला केंद्रबिंदू ठेऊन त्यांच्या हिताचे निर्णय शासन घेत आहे. कमवा आणि शिका, स्पर्धा परीक्षा केंद्रे, प्रत्येक महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास करण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  उदय सामंत यांनी आज सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महात्मा फुले सभागृहात व्यवस्थापन, अधिसभा, विद्या परिषद सदस्य आणि विद्यार्थ्यांशी श्री. … Read more

शेतकऱ्यांना शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून द्यावे – सुभाष देसाई

औरंगाबाद – जिल्ह्यातील धरण व कालव्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करुन शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याचे सुक्ष्म नियोजन तसेच पाण्याचा वहनव्यय, कालव्याची देखभाल दुरस्ती व बांधकाम, पाणी आवर्तन, पाणीपट्टी वसुली बाबत उद्ष्टिसाध्य, याबाबतच आढावा आज सिंचन भवन येथे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला. यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कालवा … Read more

लसीकरणाबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमध्ये विश्वास वाढावा यासाठी पर्यटनाशी संबंधित क्षेत्रातील सर्व व्यक्तींचे मोठ्या प्रमाणावार लसीकरण करावे, असे निर्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी औरंगाबाद जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून लवकरच संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण पूर्ण करणार असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी … Read more

तीर्थक्षेत्रांचा दर्जा वाढविण्याबाबत परिपूर्ण प्रस्ताव सादर करा – अब्दुल सत्तार

औरंगाबाद – खुलताबाद येथील हजरत शेख मुन्तजबुद्दीन जर जरी बक्ष आणि भद्रा मारोती येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. ह्या दोन तीर्थक्षेत्रांच्या दर्जात वाढ करण्याच्या अनुषंगाने पालिकेने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा असे आवाहन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार  यांनी केले आहे. खुलताबाद येथे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, … Read more

‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मिळणार ५५५.३९ कोटी

औरंगाबाद – काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसाने, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या (एनडीआरएफ) निकषातील देय मदतीपेक्षाही अधिक म्हणजेच एकूण ५५५.३९ कोटींची आर्थिक मदत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना होणाऱ्या या आर्थिक मदतीबाबत पालकमंत्री देसाई यांनी समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे … Read more