अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या तुरीच्या शेंगा काळवंडल्या आहेत. खरिपातील हे पीकही आता संकटात सापडले आहे. मागील आठ ते दहा दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे.
कडाक्याची थंडी, दाट धुके या धुक्यामुळे निर्माण होणारा ओलावा तर कधी रिमझिम पाऊस, अशा विचित्र वातावरणाचा फटका रब्बी पिकांसह तूर व हळदीलाही या भागात बसत आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच कधी अवकाळी तर कधी अतिवृष्टी याचा सामना करीत शेतकरी अडचणीत राहिला. खरिपातील प्रमुख पिके त्याच्या हातातून गेली. खरिपातील केवळ तुरीचे पीक उभे होते.
WhatsApp आपल्या युझर्ससाठी आणणार एक खास फिचर
यावर अपेक्षा ठेवलेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा वातावरण बदलाचा फटका बसत आहे. या भागात दररोज कडाक्याची थंडी, जोरदार धुके पडत आहे. यामुळे तुरीच्या शेंगा काळवंडल्या आहेत. वाळलेल्या शेंगा धुक्यामुळे तयार होणाऱ्या आर्द्रतेने खराब होत आहेत. यामुळे तुरीचे उत्पादन प्रभावित होणार आहे. शिवाय तुरीचा दर्जाही खालावण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
खानदेशात थंडीत वाढ; पारा १४ अंशांवर https://t.co/7FJg0LO1Ny
— KrushiNama (@krushinama) January 7, 2020