परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा गहू पेरणीवर जोर

अनेक वर्षांच्या खंडानंतर यंदा गव्हाच्या पेरणीक्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्याने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा पार केला आहे. सर्वसाधारण ३० हजार ४७६ हेक्टर क्षेत्र असताना ३२ हजार २०८ हेक्टरवरपेरणी झाली आहे. जिल्ह्यात मंगळवार  पर्यंत २ लाख ४७ हजार ५९६ हेक्टरवर रब्बी पेरणी झाली आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

उशीरा येणारे तूर पीक मातीमोल ! शेतकऱ्यांचे अर्थचक्र तूर पिकाच्या भरवश्यावर

जिल्ह्यात जिंतूर, सेलू, मानवत, पूर्णा या चार तालुक्यांतील पेरणीक्षेत्राने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा ओलांडला आहे. उर्वरित पाच तालुक्यांतील पेरणी क्षेत्र अद्याप सरासरीपेक्षा कमी आहे. ज्वारी १ लाख ५९ हजार ७८ हेक्टर, गहू ३० हजार ४७६ हेक्टर, हरभरा ५३ हजार २६४ हेक्टर, जवस १ हजार १९९ हेक्टर, सूर्यफूल १ हजार ९३ हेक्टर आदी पिकांची एकूण २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.

राज्याच्या विविध भागात समाधानकारक पाऊस

ज्वारीची १ लाख २७ हजार ३६३ हेक्टरवर, गव्हाची ३२ हजार २०८ हेक्टरवर, हरभऱ्याची ८० हजार १५८, करडईची ५ हजार ६२७, जवसाची १२, मक्याची ६८३, तर सूर्यफुलाची ३९ अशी एकूण २ लाख ४७ हजार ५९६ हेक्टर म्हणजेच ७९.६६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. जिंतूर, सेलू, मानवत, पूर्णा तालुक्यांमध्ये जास्त क्षेत्रावर पेरणी झाली. परभणी, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांत ५०.५२ ते ९३.४१ टक्के पेरणी झाली.