दुष्काळी भागात उभारलेल्या चारा छावण्यात आहे तब्बल ‘इतके’ पशुधन

राज्यात दुष्काळ जाहीर केलेल्या भागात आतापर्यंत जनावरांसाठी एकूण १ हजार ६३८ चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. यात ९ लाख ३७ हजार ९४८ मोठे तर १ लाख १५हजार ८६१ छोटे असे एकूण १० लाख ५३ हजार ८०९ पशूधन दाखल करण्यात आले आहे. या चारा छावण्यांसाठी आतापर्यंत ६२ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून उर्वरित रक्कम लवकरच देण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य रामहरी रुपनवर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना देशमुख बोलत होते. देशमुख म्हणाले, बीड जिल्ह्यातील चारा छावण्यात सुमारे तीन लाख जनावरे ठेवण्यात आली होती. या जनावरांना टॅगिंग करण्यात आले होते. तरीही या भागात चारा छावण्यांमध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित झाला असल्याने या भागातील चारा छावण्यांची चौकशी करण्यात येईल. पालघरमधील दुष्काळग्रस्त तालुक्यातून चारा छावणीसाठी प्रस्ताव आल्यास चारा छावणी उभी करण्याचेही त्यांनी आश्वासन दिले.

रेशन कार्डधारकांना महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन उपलब्ध होणार- जयकुमार रावल

आले (आद्रक) लागवडीचे तंत्र