बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठवण्याचा निर्णय निर्णय शेतकरी हिताचा – अजित पवार

मुंबई – “राज्यातील बैलगाडा (Bullock cart) शर्यतींवरची बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले असून हा निर्णय राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा, पशुधनाचं संरक्षण, संवर्धन करणारा ठरेल. या निर्णयानं बैलधारक शेतकऱ्यांनी प्रदीर्घ लढाई जिंकली आहे. हा राज्यातल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. या लढाईत आदरणीय शरद पवार साहेबांनी लक्ष घातलं. मंत्री दिलीप वळसे पाटील, … Read more

प्रशासनाचे दुर्लक्ष ; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात

जिल्ह्यात पडलेल्या सततच्या पावसामुळे शेळ्या-मेंढ्यांना फुटरोट या विषाणूजन्य रोगाची लागण झाली आहे. यामुळे मेंढपाळाच्या कळपातील अनेक शेळ्यामेंढ्या यापासून बाधित झाल्या आहेत. तसेच नीरा परिसरातील राख, नावळी, गुळूंचे, कर्नलवाडी, पिसुर्टी आदी भागातील मेंढपाळांच्या मेंढ्या ह्या तर मृत्युमुखी पडल्या आहेत. काही मेंढपाळ्याना आपली जनावरे ही कवडीमोल भावाने विकावी लागली आहेत. जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली खूप … Read more

तालुका पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राच्या आधारे शेतकऱ्यांना मिळणार पशुधनाची नुकसान भरपाई

पूरग्रस्त भागातील विमा उतरविलेल्या आणि पुरात वाहून गेलेल्या अथवा मृत झालेल्या जनावरांच्या बाबत तालुका पशु‍धन विकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरून दि. न्यू इंडिया एश्योरन्स, युनायटेड इंडिया एश्योरन्स, नॅशनल एश्योरन्स, ओरिएंटल एश्योरन्स या चार कंपन्या  नुकसान भरपाई देणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकाव्दारे दिली. पत्रकात म्हटले आहे, दि. न्यू इंडिया एश्योरन्स, युनायटेड इंडिया एश्योरन्स, नॅशनल एश्योरन्स, ओरिएंटल एश्योरन्स या चार … Read more

दुष्काळी भागात उभारलेल्या चारा छावण्यात आहे तब्बल ‘इतके’ पशुधन

राज्यात दुष्काळ जाहीर केलेल्या भागात आतापर्यंत जनावरांसाठी एकूण १ हजार ६३८ चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. यात ९ लाख ३७ हजार ९४८ मोठे तर १ लाख १५हजार ८६१ छोटे असे एकूण १० लाख ५३ हजार ८०९ पशूधन दाखल करण्यात आले आहे. या चारा छावण्यांसाठी आतापर्यंत ६२ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून उर्वरित रक्कम … Read more