Bell Papper Benefits | टीम कृषीनामा: बहुतांश लोकांना शिमला मिरची खायला आवडत नाही. अनेकदा ते जेवणामधून शिमला मिरची बाहेर काढून ठेवतात. पण तुम्हाला माहित आहे का? शिमला मिरची आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शिमला मिरचीमध्ये तिखटपणा कमी असतो. त्याचबरोबर या मिरचीमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि विटामिन्स भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे शिमला मिरचीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. शिमला मिरचीचे सेवन केल्याने आरोग्याला पुढील फायदे मिळू शकतात.
कॅन्सरसोबत लढण्यासाठी उपयुक्त (Beneficial for cancer-Bell Papper Benefits)
शिमला मिरचीमध्ये अँटिइफ्लेमेटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात. हे गुणधर्म कॅन्सरशी लढण्यास मदत करतात. त्याचबरोबर शिमला मिरचीमध्ये ऍपिजेनिन, ल्युटोलिन, ल्युपेओल, क्वेर्सेटिन आणि कॅपसिएट, लाइकोपीन, बीटा-क्रिप्टोक्सॅन्थिन आणि बीटा-कॅरोटीन यांसारखे अँटिऑक्सिडंट आढळून येतात, जे कर्करोगाशी लढण्यास मदत करतात.
डोळ्यांसाठी फायदेशीर (Good for eyes-Bell Papper Benefits)
शिमला मिरचीमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हे दोन कॅरेटिनाइड्स भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे डोळ्यांची काळजी घेण्यास मदत करतात. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात शिमला मिरचीचा समावेश करू शकतात.
शरीराला विटामिन प्रदान करते (Provides vitamins to the body-Bell Papper Benefits)
शिमला मिरचीमध्ये विटामिन ए आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात आढळून येते, शरीराला संसर्गजन्य रोगापासून दूर ठेवते. त्याचबरोबर शिमला मिरचीमध्ये विटामिन बी 6 आणि फॉलेट देखील मुबलक प्रमाणात आढळून येते, जे होमोसिस्टीनची पातळी कमी करण्यास मदत करते. त्यामुळे शरीरातील विटामिनची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात शिमला मिरचीचा समावेश करू शकतात.
शिमला मिरचीचे सेवन केल्याने आरोग्याला वरील फायदे होऊ शकतात. त्याचबरोबर प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलाबाचे आरोग्याला पुढील फायदे मिळू शकतात.
मुळव्याधासाठी फायदेशीर (Beneficial for piles-Rose Health Benefits)
तुम्ही जर मुळव्याधाचे रुग्ण असाल तर गुलाबाच्या पाकळ्या तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. गुलाबाच्या पाकळ्याच्या मदतीने पचनक्रिया सुधारून आतड्यांची संबंधित हालचाल वाढू शकते. त्याचबरोबर यामध्ये आढळणारे फायबर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करतात.
तणाव कमी होतो (Reduces stress-Rose Health Benefits)
गुलाबाच्या पाकळ्या मनाला शांत करून तणाव दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. आरोग्य तज्ञांच्या मते, अंघोळीच्या पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकल्याने तणाव कमी होऊन मन शांत होऊ शकते. तुम्हाला जर थकवा किंवा चिंतेमुळे झोप येत नसेल तर तुम्ही बेडवर गुलाबाची फुले ठेवून झोपू शकतात. गुलाबाच्या सुगंधाने थकवा आणि चिंता दूर होण्यास मदत होते.
वजन कमी होते (Weight loss-Rose Health Benefits)
गुलाबाच्या पाकळ्यामध्ये आढळणारे घटक वजन कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर गुलाबाच्या पाकळ्या शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये दहा ते पंधरा गुलाबाच्या पाकळ्या उकळून घ्याव्या लागतील. त्यानंतर तुम्हाला या पाण्यामध्ये चिमूटभर दालचिनी आणि एक चमचा मध मिसळून घ्यावा लागेल. नियमित या पियाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या