काकडी हे भारतीय पिक असल्याने सर्व देशभर याची लागवड केली जाते. काकडी कोकणासारख्या अतिपर्जन्याच्या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्पादन निघते. काकडी पासून कोशिंबिर बनविली जाते. त्यामुळे या वेलवर्गीय भाजीचे आहारामध्ये दररोज उपयोग होतो. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 3711 हेक्टरवर या पिकाची लागवड होते. चला तर मग जाणून घेऊ फायदे..
आरोग्यासाठी केळी खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे
- काकडीमध्ये अँटी इन्फ्लेमेट्ररी फ्लेवनॉईल असतं ज्याला फिसेटिन असं म्हटलं जातं. जे मेंदूच्या स्वास्थामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतं. तुमच्या स्मरणशक्तीतील सुधार आणि आयुष्याशी निगडीत कोशिकांचं संरक्षण हे घटक करतात. शिवाय फिसेटिन तुमची बुद्धी तल्लख करतं आणि अल्झायमर रोग बरा करण्यासाठी जे सक्षम असल्याचं आढळलं आहे.
जाणून घ्या मोसंबी खाण्याचे ‘हे’ फायदे
- काकडीत पॉलीफेनोल आढळतं जे स्तन, गर्भाशय आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यात मदत करतं. याशिवाय काकडीत फिओनोट्रीयंट्स असतात ज्यामध्ये कॅन्सर दूर करण्याचे गुण असतात.
- जर तुम्हाला तोंडाच्या दुर्गंधीची समस्या असेल तर तोंडात एक काकडीचा तुकडा धरून ठेवा. काकडीच्या वासाने तोंडात दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियापासून तुमची सुटका होईल. आयुर्वेदानुसार, काकडी खाल्ल्याने पोटातील अतिरिक्त उष्णता कमी होण्यास मदत मिळते. या उष्णतेमुळे मुख्यतः तोंडाची दुर्गंधी होते.
महतवाच्या बातम्या –