आयुष्यात आनंदी राहण्यासाठी ‘या’ सोप्या गोष्टी !

आयुष्यात आनंद असेल तरच मजा आहे, आणि तो मिळवणं अवघडही नाही. आपण मात्र आनंदासाठी झुरत राहतो. त्यापेक्षा नवीन वर्षाचा संकल्प म्हणून या सोप्या गोष्टी करून पाहा.

चांगली मैत्री- निस्वार्थ मैत्री ही आनंदी जीवनाची एक गुरुकिल्ली आहे. दुसऱ्यांच्या हृदयात आपल्यासाठी एक विशेष जागा असणं ही भावनाच सुखावणारी असते. ज्या व्यक्ती दुसऱ्यांच्या आयुष्यात आपलं स्थान पक्क करतात त्या जीवनात कधीच एकट्या आणि दुखी राहत नाही.

तुम्हाला माहितीये का सर्वाधिक पॉप्युलर आयफोन कोणताय?

धोरण- आयुष्य जगण्याची काही धोरणं असतात आणि जे लोक आपल्या आयुष्यातील ठरलेल्या धोरणांचं पालन करतात ते सर्वात जास्त आनंदी असतात. ते लोक कधीच चुकीच्या गोष्टींकडे आकर्षित होत नाहीत. अशा लोकांना समाजात नेहमी सन्मान मिळतो.

शौर्य- इतरांच्या भीतीमुळे किंवा दबावामुळे चुकीच्या गोष्टी करण्यापेक्षा इतरांसमोर निर्भिडपणे आपलं मत मांडणं केव्हाही चांगलं. तुमच्याकडे कोणाचीही भीती न बाळगता सत्य बोलण्याची हिंम्मत असेल तर तुम्ही आयुष्यात नेहमी आनंदी राहू शकता.

जाणून घ्या; कशी करावी जिरायती गव्हाची पेरणी

लाज- ज्यांना फारशी लोकांच्या भाव- भावनांची चिंता नसते. तसेच त्यांच्याबद्दल कोण काय बोलतं याची ते तमा बाळगत नाहीत अशा लोकांची प्रतिमा समाजात फारशी चांगली नसते. मात्र ज्या व्यक्ती स्वतःच्या प्रतिमेला जपून असतो तो व्यक्तीही आयुष्यात आनंदी राहतो.माफ करा- ज्या व्यक्ती इतरांच्या चुका माफ करतात तेही आयुष्यात आनंदी राहतात.

व्यवसाय- व्यावसायिकता हा गुण प्रत्येकाच्या अंगी असणं फार महत्त्वाचं आहे. पैसे कमवण्याची कला ज्याच्याकडे असते ते आयुष्यात कधीच दुःखी होत नाहीत.