हिवाळ्यात सिताफळ भरपूर प्रमाणात येतात. हंगामी फळ खाल्यानं शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होते. सीताफळ सगळ्यांनाच आवडतं पण त्याच्या खास फायद्यांबद्दल खूप कमी लोक जाणतात. बाहेरून थोडं कडक पण आतून नरम आणि खायला गोड असणाऱ्या सीताफळाचे खालील फायदे नक्की वाचा.
1. सीताफळामध्ये कॅलशियम, सी जीवनसत्व आणि मॅग्नेशियम, फायबर आणि इतर अनेक पोषक द्रव्ये असतात. त्याने आपल्या शरीराला ताकद मिळते.
2. कमी रक्तदाब आणि मधुमेह रूग्णांसाठी सीताफळ खूप फायदेशीर आहे.
3. नियमित सीताफळ खाल्याने पचनक्रिया सुधारते. शरीरात रक्ताची योग्य पातळी राखण्यास मदत होते.
4. सीताफळामध्ये तांबे-लोहं असल्यामुळे त्याचा गर्भवती महिलांसाठी देखील खूप फायदा आहे. त्याच्या आहारामुळे गर्भधारणेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होतात.
5. सीताफळामध्ये व्हिटामिन बी-6चं प्रमाणात जास्त असतं. त्यामुळे अस्थमाचा त्रास रोखण्यात मदत होते.
6. हृदयाचे त्रास असणाऱ्यांनी सीताफळ नियमित खावे. हृदयाच्या सगळ्या आजारांवर सीताफळ हे अतिशय फायदेशीर आहे.
7. अतिसार झाला असेल तर सीताफळ थोड्या थोड्या अंतरानं खावं. अथवा सीताफळाचा रस घ्य़ावा.
जाणून घ्या रोज मनुके खाण्याचे फायदे….
8. सर्दी, ताप, जुलाब या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी सीताफळ मदत करतं. यासोबत शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतं. जेवणानंतर दोन तास अथवा जेवणाआधी दोन तास सिताफळ खाणं उत्तम. जेवल्यावर किंवा रात्री सीताफळ शक्यतो खाणं टाळावं.
9. सीताफळाचं सेवन केल्याने शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळते. सीताफळाने अॅनिमिया दूर होतो. त्यामुळे थकवा येणार असेल तर सीताफळाचं सेवन करावं.
10. हिवाळ्यात सिताफळ भरपूर ऊर्जा देतं. याशिवाय सिताफळाचा गुणधर्म थंड असतो. याशिवाय केस गळण्याच्या समस्या, केसांची वाढ होण्यास मदत असते.
आयुष्यात आनंदी राहण्यासाठी ‘या’ सोप्या गोष्टी ! https://t.co/w7fCEUlOfp
— KrushiNama (@krushinama) December 25, 2019
खेडा खरेदीत शेतकऱ्यांना कपाशी, पपईला कमी मिळतोय दर https://t.co/mKfrJdkCLc
— KrushiNama (@krushinama) December 25, 2019