नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या गवारीची आवक २१ क्विंटल इतकी झाली आहे. गवारला सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४००० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल असे दर मिळत आहे. सर्वसाधारण दर हा ५००० रुपये राहिला, अशी माहिती देण्यात आली आहे.
वटवाघळांनी आपला मोर्चा द्राक्ष बागांकडे वळविला
तर नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भोपळ्याची आवक ९६१ क्विंटल होती. त्यास २०० ते ६६५ असा दर होता.कोबीची आवक ९९६ क्विंटल झाली. तिला सरासरी ४१५ ते ६६० असा दर होता. कारल्याची आवक २६४ क्विंटल झाली. त्यास १५०० ते २१२५ असा दर होता. दोडक्यांची आवक ७७ क्विंटल झाली. त्यांना १२५० ते १९६० असा दर मिळाला.
बाजार समितीमध्ये धानाची आवक मंदावली
कांद्याची आवक १४८० क्विंटल झाली. त्यास १२०० ते ३१०० दर होता. वांग्यांची २२५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये असा दर होता. भेंडीची आवक ५६ क्विंटल झाली. तिला २५०० ते ३७५० दर होता. फ्लॉवरची आवक ४५९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते ८६० दर होता. ढोबळी मिरचीची आवक ११८ क्विंटल झाली. तिला २१२५ ते ३०६० दर होता. हिरव्या मिरचीची आवक ८२ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १४०० ते २५०० असा दर मिळाला. बटाट्याची आवक १२८८ क्विंटल झाली. त्यास १००० ते १६५० दर होता.
राजारामबापू साखर कारखान्याने जिंकली 7/12 ची लढाई https://t.co/K0grqXkTvU
— KrushiNama (@krushinama) January 30, 2020