Camphor And Coconut Oil | केसांना खोबरेल तेल आणि कापूर लावल्याने मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Camphor And Coconut Oil | टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये बहुतांश घरात पूजेसाठी कापुराचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का? केसांच्या समस्या दूर करण्यासाठी कापूरचा वापर केला जाऊ शकतो. कापुरामध्ये आढळणारे गुणधर्म केसांसाठी फायदेशीर ठरू शकतात. कापुरामध्ये अँटीफंगल तसेच मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी कापूर उपयुक्त ठरू शकतो. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही कापुराचा वापर खोबरेल तेलासोबत करू शकतात. या दोन्ही नैसर्गिक गोष्टींचा एकत्र वापर केल्याने केसांना अनेक फायदे मिळू शकतात.

केसांना कापूर आणि खोबरेल तेल लावण्यासाठी, तुम्हाला एका भांड्यात गरजेनुसार खोबरेल तेल घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक ते दोन कपूर मिसळून तेल गरम करून घ्यावे लागेल. हे तेल कोमट झाल्यानंतर तुम्ही केसांना त्याने मसाज करू शकतात. केस धुण्याच्या किमान चार तास आधी तुम्हाला हे मिश्रण केसांना लावावे लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रात्रभर हे मिश्रण केसांना लावू शकतात. आठवड्यातून दोन ते तीन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने केसांच्या पुढील समस्या दूर होऊ शकतात.

कोंडा दूर होतो (Removes dandruff-Camphor And Coconut Oil Benefits)

खोबरेल तेल आणि कापुराच्या मिश्रणाने केसातील कोंड्याची समस्या दूर होऊ शकते. कारण या मिश्रणामध्ये अँटिबॅक्टरियल आणि अँटी फंगल गुणधर्म आढळून येतात, जे केसातील एलर्जी, खाज, बुरशी, बॅक्टेरिया इत्यादी गोष्टी दूर करतात. परिणामी केसातील कोंडा कमी होतो.

केसांची चमक वाढते (Hair shine increases-Camphor And Coconut Oil Benefits)

केसांची चमक वाढवण्यासाठी कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर या मिश्रणाच्या नियमित वापराने कोरड्या केसांची समस्या देखील दूर होऊ शकते. कापूर आणि खोबरेल तेलाच्या मिश्रणाने केस चमकदार होऊ शकतात.

केस गळणे कमी होते (Hair fall is reduced-Camphor And Coconut Oil Benefits)

नियमित खोबरेल तेल आणि कापुराचे मिश्रण वापरल्याने केस गळणे कमी होऊ शकते. या दोन्ही नैसर्गिक गोष्टींमध्ये आढळणारे गुणधर्म केसांना दाट आणि मजबूत बनवण्यास मदत करतात. नियमित हे मिश्रण लावल्याने केसांच्या वाढीस चालला मिळते.

केस वाढीस मदत होते (Helps in hair growth-Camphor And Coconut Oil Benefits)

खोबरेल तेल आणि कापुराचे मिश्रण आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरल्याने केसांच्या वाढीस चालना मिळू शकते. या मिश्रणाच्या मदतीने केस चमकदार होऊ शकतात. त्याचबरोबर या मिश्रणाच्या नियमित वापराने केसांचा रंग टिकून राहतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Wheat Flour | नैसर्गिक पद्धतीने त्वचेची काळजी घेण्यासाठी गव्हाच्या पिठाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Skin Care With Coffee | चेहरा स्वच्छ करण्यासाठी कॉफीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Maida Side Effects | मैद्यापासून बनलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Beauty Tips | चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी टोमॅटोचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Skin Care With Aloevera | चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी कोरफडीमध्ये मिसळा ‘या’ गोष्टी