मुंबई – कोकमचे सरबत उन्हाळ्यात पिण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात लिंबू सरबतासोबत कोकमच्या सरबतालाही अधिक पसंती दिली जाते. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत सतत तहान लागत असते. यावेळी अनेकांना कोल्ड्रिंक पिण्याचा मोह आवरत नाही. उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे अतिशय आवश्यक असते.
शरीरामध्ये पाण्याची कमी झाल्यानंतर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपण उन्हाळ्यात चांगल्या आहारावर जास्त भर देतो. त्यामध्ये उन्हाळ्यात आपण जास्त करून कलिंगड खाण्यावर भर देतो. कारण कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. जे उन्हाळ्यात शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जातात. मात्र, तुम्हाला हे माहिती काय? की, कलिंगड खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये.
1.कलिंगडमध्ये साधारण 92 ते 96 टक्के पाण्याचं प्रमाण असते. यामुळे अगोदरच आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण चांगले असते त्यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे शक्यतो टाळावे.
2.पाण्याचे प्रमाण जास्त असणाऱ्या फळांवर पाणी पिल्यास कॉलरा देखील होऊ शकतो. मात्र फळ इंफेक्टेड असेल, तरच असं होऊ शकते.
3.फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, म्हणून कुणीही ते खाऊ शकत नाही. किडनीचे रुग्ण, मधुमेहाचे रुग्ण आणि हदयाचा आजार ज्यांना असेल, त्यांनी कलिंगड खाणे शक्यतो टाळावे.
महत्वाच्या बातम्या –
- शेतकऱ्यांवर मोठं संकट; राज्यात आणखी दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता
- दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती
- शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी या मागणीसाठी विम्याच्या प्रतिकात्मक अध्यादेशाची शेतकऱ्यांकडून होळी
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आज सकाळपासून विजांच्या कडकडासह अवकाळी पावसाला सुरवात
- झोपण्यापूर्वी दुधात तूप टाकून प्या, होतील खास फायदे