रोज सकाळी मनुके खाणं कधीही चांगले. मनुके आपल्या शरीरातील पेशींची संख्या वाढवण्यास मदत करतात. मनुक्यात लोह मोठ्या प्रमाणात असते. मनुक्यामध्ये दही घालूनही ते खाऊ शकता. मनुक्याच्या सेवनामुळे शरीरातील उर्जा वाढते आणि अशक्तपणा दूर होतो.
मणुकात बोरॉन ह्या रासायनिक घटकाचे प्रमाण आढळते. हाडांमध्ये कॅल्शियमचे योग्यप्रकारे शोषण होण्यास मदत होते. कॅल्शियम हा घटक हाडांसाठी व सांध्यांसाठी खूप महत्वाचा असतो. अशाप्रकारे मनुके खाण्यामुळे हाडांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.
तसेच यामुळे स्त्रियांमध्ये मेनोपॉज नंतर होणारा ऑस्टिओपोरोसिसचा धोकाही कमी होतो. काळ्या मनुकांमध्ये लोह आणि पोटॅशियमचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे हिमोग्लोबीन, नियमित येणारा थकवा यांसारख्या समस्या भेडसावत नाहीत.
मनुकांमधील फायबर्समुळे हे पचनशक्ती चांगली राहते. यात लोह असतात. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. काळ्या मनुका भिजवून खाल्ल्या तर त्या शरीरासाठी लाभदायी आहेत. मनुकांमधील कॅरोटिन द्रव डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.
महत्वाच्या बातम्या –
राज्यातील ऊसटंचाईचा कामगारांच्या रोजगारावर होणार परिणाम
जाणून घ्या , तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे
आता गोदावरी नदीचा पूर ओसरल्याने , येत्या तीन दिवसांत पंचनामे सादर करण्याचे आदेश