Oily Skin | टीम कृषीनामा: ग्लिसरीन (Glycerin) आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्वचेची काळजी घेण्यासाठी आरोग्य तज्ञ देखील ग्लिसरीन वापरण्याचा सल्ला देतात. बहुतांश सौंदर्य उत्पादनामध्ये ग्लिसरीनचा वापर केला जातो. कारण ग्लिसरीन त्वचेची काळजी घेण्यासोबतच त्वचेला हायड्रेट ठेवते. त्याचबरोबर तेलगट त्वचेची काळजी घेण्यासाठी ग्लिसरीन उपयुक्त ठरू शकते. तुम्ही जर तेलकट त्वचेच्या समस्येपासून त्रस्त असेल तर तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये ग्लिसरीनचा समावेश करू शकतात. तेलकट त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही पुढील पद्धतीने ग्लिसरीनचा वापर करू शकतात.
ग्लिसरीन आणि लिंबाचा रस (Glycerin and lemon juice-For Oily Skin)
तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी ग्लिसरीन आणि लिंबाचा रस फायदेशीर ठरू शकतो. यासाठी तुम्हाला एक चमचा लिंबाच्या रसामध्ये एक चमचा ग्लिसरीन मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचा स्वच्छ होऊन त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाऊ शकते.
ग्लिसरीन आणि गुलाब जल (Glycerin and rose water-For Oily Skin)
तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ग्लिसरीन आणि गुलाब जल फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा ग्लिसरीनमध्ये एक चमचा गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण साधारण दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील चमक वाढू शकते.
ग्लिसरीन आणि मुलतानी माती (Glycerin and Multani Mati-For Oily Skin)
तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही मुलतानी मातीमध्ये ग्लिसरीन मिसळू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा मुलतानी मातीमध्ये एक चमचा ग्लिसरीन आणि एक चमचा गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर साधारण दहा ते पंधरा मिनिटे लावून ठेवावी लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा वापर केल्याने पिंपल्स आणि फ्रिंकल सारख्या समस्या सहज दूर होऊ शकतात.
तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही ग्लिसरीनचा वरील पद्धतीने वापर करू शकतात. त्याचबरोबर केसांना नियमित मोहरीचे तेल लावल्याने पुढील फायदे मिळू शकतात.
केसातील कोंडा दूर होतो (Removes dandruff-Mustard Oil Benefits)
मोहरीच्या तेलामध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात, जे केसातील घाण दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्हाला जर टाळूमध्ये एलर्जी किंवा संसर्ग झाला असेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा वापर करू शकतात. त्याचबरोबर मोहरीच्या तेलाच्या नियमित वापराने केसातील कोंड्याची समस्या देखील सहज दूर होते.
केस तुटणे थांबते (Stops hair fall-Mustard Oil Benefits)
तुम्ही जर केस तुटण्याच्या समस्येपासून त्रस्त असाल, तर मोहरीचे तेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मोहरीच्या तेलाने टाळूची मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते. परिणामी केस तुटणे थांबते. त्याचबरोबर मोहरीच्या तेलाचा वापर केल्याने केस मुळापासून मजबूत होतात आणि केस गळतीची समस्या कमी होते.
केसांना पोषण मिळते (Hair is nourished-Mustard Oil Benefits)
मोहरीच्या तेलामध्ये भरपूर पोषक घटक आढळून येतात. यामध्ये प्रोटीन, आयरन, कॅल्शियम, ओमेगा 3 फॅटी ऍसिड, सेलेनियम आणि अँटिऑक्सिडेंट यांचा समावेश आहे. त्यामुळे मोहरीच्या तेलाने केसांना मसाज केल्यावर केसांच्या अनेक समस्या सहज दूर होतात. त्याचबरोबर या तेलाच्या वापराने केसांच्या वाढीस चालना मिळते.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या