मुद्रांमध्ये पृथ्वी मुद्रेचे खूप महत्व आहे. आपल्यात असलेले पृथ्वी तत्व त्या माध्यमातून जागृत होत असते. शरीरातील दोन नाड्यांमधील एक सूर्यनाडी व दूसरी चंद्र नाडी असते. पृथ्वी मुद्रा करताना अंगठ्याने अनामिकेला म्हणजेच सूर्य बोटावर दाब दिला जातो. त्यामुळे सूर्य नाडी व स्वर सक्रिय होण्यास सहकार्य मिळत असते.
पृथ्वी मुद्रा कशी करायची ?
तुम्हाला जे आसन आरामदायक वाटत असेल त्यामध्ये बस पण कंबर आणि मान सरळ ठेवा. तुमच्या दोन्ही हातांची अनामिका ही बोटं वाकवा आणि त्यांचं टोक अंगठ्याच्या अग्रभागी टेकवा. बाकीची तीन बोटं सरळ राहतील आणि तुमचे हात गुडघ्यांवर ठेवा. इथे तळव्यांची दिशा वरच्या बाजूला राहिल. तळवे घट्ट आणि मनगटांच्या वर खांद्यापर्यंत हात सैलसर राहिल. किमान १० ते १५ मिनिटं ही मुद्रा करा. काही दिवसांनंतर तुम्हाला फरक जाणवू लागेल.
काय आहेत त्याचे फायदे –
आनंद, उत्साह, स्फूर्ती कुणाला नको असते? त्यासाठी तुमच्या शरीरामध्ये पृथ्वी तत्त्व असायला हवं. पृथ्वी मुद्रामुळे शरीरात पृथ्वी तत्त्व वाढतं आणि शारीरिक दुर्बलता आणि आळसाची भावना दूर होते. अंगात स्फूर्ती येते, आत्मविश्वास वाढतो. जे लोक सडपातळ आहेत त्यांचं वजन वाढवण्यात उपयुक्त ठरतं. हाडं मजबूत होतात. ऑस्टियोपोरोसिस, सुकलेली त्वचा, केसगळती, डोळ्यांत होणारी जळजळ, पोटात होणारा गॅस, मूत्रमार्गात होणारा दाह, गुदमार्गात होणारी जळजळ, हातांना वाटणारी जळजळ, तोंडामध्ये आणि पोटात अल्सर यातही ही मुद्रा गुणकारी आहे. शरीरात स्फूर्ती जाणवणं, कांती आणि चेहऱ्यावरील तेज वाढवण्याचं काम ही मुद्रा करते. ही करत राहिल्यानं आयुष्यात नवी प्रेरणा मिळत राहते, शक्ती वाढते आणि मुख्य म्हणजे अन्नाचं पचन चांगल्या प्रकारे होतं.
महत्वाच्या बातम्या –
एरियल फवारणीसाठी सेंट्रल इन्सकेटीसाईड बोर्डाची (‘सिआयबी’) परवानगी गरजेची
जाणून घ्या ; कलियुगातही वरदान ठरणाऱ्या तुळशीच्या पानांचे फायदे……