सध्या कांदा हा सगळ्यांच्याच डोळ्यातून पाणी काढत आहे. कांद्याचे दर आभाळाला भिडले आहेत. आता कांदा १०० ते १२० रुपये किलोच्या आसपास पोहोचले आहेत. पण असा देखील कांदा आपल्या डोळ्यातून पाणी काढतोच. कधीही कुणीही कांदा कापला तर त्याच्या डोळ्यातून पाणी का येत? या मागचं कारण आपण आज जाणून घेणार आहोत.
IND vs WI : ‘तू तर पावशेर पण नाहीस’; नेटकऱ्यांनी उडवली चहलची खिल्ली
कांदा हा अनेक पापुद्रांनी बनलेला असतो. यामध्ये प्रॉपेंथियल-एस-ऑक्साइड नावाचं रसायन असतं. हे रसायन कांदा कापताना आपल्या डोळ्यातील लेक्राइमल ग्लँडला उत्तेजित करतात. ज्यामुळे आपल्या डोळ्यातून कांदा कापताना पाणी येतं. बाष्पनशील असलेल्या या रसायनाचे रुपांतर वायूत होतं. हा वायू थेट डोळ्यात जातो. या वायूतील सलफ्युरिक ऍसिड डोळे चुरचुरण्यास कारणीभूत असतात. यामुळे डोळ्यातून पाणी येते. पण यामुळे डोळ्यांना कोणताही त्रास होत नाही उलट यामुळे अधिक डोळे मोकळे होतात.
कांदा झाला सव्वाशे पार; बाजारात नव्या कांद्याची आवक होऊनही दरात उतार नाही
अनेकांना कांदा कापताना अतिशय त्रास होतो. अशावेळी खालील उपाय करा
1. कांदा कापल्यावर वाहत्या पाण्याखाली म्हणजे नळाखाली धरा
2. कांदा कापताना सर्वात प्रथम खालचा पांढरा भाग काढून टाका
3. कांदा कापण्यापूर्वी 20 ते 25 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा
4. कांद्याचे दोन भाग केल्यानंतर पाण्याने भरलेल्या भांड्यात बुडवून ठेवा
रोज दारु पिणाऱ्यांमध्ये कॅन्सरची लक्षणं https://t.co/Eot1qn14Gb
— KrushiNama (@krushinama) December 24, 2019
जिमला जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टींच सेवन टाळा; या गोष्टी शरिरासाठी घातक https://t.co/3R3Ln3WiL7
— KrushiNama (@krushinama) December 24, 2019