रोज एक पेग दारु पिणाऱ्यांना कॅन्सरसारख्या आजारांचाही सामना करावा लागू शकतो. रोज एक पेग दारु प्या आणि स्वस्थ राहा असा तत्वज्ञानाचा डोस अनेकजण दुसऱ्यांना पाजत असतात. या माध्यमातून स्वतःच्या दारु पिण्याचं ते एकप्रकारे समर्थन करत असतात. पण अशा लोकांसाठी एक धोक्याची सूचना देणारं संशोधन समोर आलं आहे.
जाणून घ्या विलायची खाण्याचे फायदे
रोज एक पेग दारु पिणाऱ्यांना कॅन्सरचा धोका असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. टोकिओ विद्यापीठातल्या मासायोशी जित्सु यांनी केलेल्या संशोधनात काही धक्कादायक तथ्यं समोर आली आहेत. १० वर्षांपासून रोज दारु पिणाऱ्यांमध्ये कॅन्सरची लक्षणं आढळतात. रोज एक पेग पिणाऱ्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचीही शक्यता वाढते.
तुळस आणि तिचे आरोग्यदायी फायदे
लिव्हर संदर्भात दीर्घकालीन आजारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दारु पिण्याऐवजी चांगल्या आरोग्यासाठी रोज व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.दारु पिण्याचे काही फायदेही असतील पण दारु प्यायल्याने होणाऱ्या तोट्यांची यादी न संपणारी आहे. त्यामुळे दारु पिणं हे कधीही अपायकारकच आहे.
जिमला जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टींच सेवन टाळा; या गोष्टी शरिरासाठी घातक https://t.co/3R3Ln3WiL7
— KrushiNama (@krushinama) December 24, 2019
वजन कमी करण्यास पनीर फायदेशीर https://t.co/N4Ovbbrlh7
— KrushiNama (@krushinama) December 24, 2019