द्राक्षबागा वाचविण्यासाठी पेपरचे आच्छादन टाकण्याचे काम सुरू

थंडी आणि धुक्यापासून दिंडोरी तालुक्यात द्राक्षबागा वाचविण्यासाठी पेपरचे आच्छादन टाकण्याचे काम सुरू आहे. दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष बांगलादेशात निर्यात होत असले तरी यावर्षीच्या जानेवारीच्या शेवटच्या आठवडयात व फेब्रूवारीच्या पहिल्या आठवडयात वाढलेल्या थंडीमुळे उत्पादकांना हुडहुडी भरली असल्याचे पाहायला मिळत आहे.

शेती पिकासाठी खर्च जास्त शेतकरी हवालदिल

दिंडोरी तालुक्यातील थंडीचे प्रमाण १२.१ अंश सेल्सीयस असले तरी दिवसा उन्हाचे चटके जाणवत असून तरी थंडीपासून गोडवा कमी होवू नये व द्राक्षांचा रंग जावू नये म्हणून उन्हापासून साखर उतरलेल्या द्राक्षांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.

पुण्यात अजित पवारांच्या हस्ते शिवभोजन थाळीचे उद्घाटन

निर्यातक्षम द्राक्षांना शेतकरी पेपराचे आच्छादन लावून आपली द्राक्षे बाहेरच्या देशात कसे जातील यासाठी प्रयत्न करत आहेत. कागद लावल्यामुळे द्राक्षांची साईज वाढते, द्राक्ष घड़ाचा दुधी कलर टिकून राहतो. निर्यात क्षम द्राक्षांना ७० ते ८० रुपैये मिळत आहे.