Share

तुम्हाला माहित आहे का? सुंदर त्वचेचे रहस्य आपल्या घरातच… त्या रहस्याचं नाव आहे… ‘कढीपत्ता’

सुंदर दिसण्यासाठी आपण सौंदर्य प्रसाधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो. पण तुम्हाला माहित आहे का? सुंदर त्वचेचे रहस्य आपल्या घरातच दडलं आहे. त्या रहस्याचं नाव आहे… ‘कढीपत्ता’. कढीपत्त्याच्या सहाय्याने तुम्ही त्वचेचे सौंदर्य वाढवू शकता. कढीपत्त्यामध्ये कार्बोदकं, फायबर, कॅल्शिअम, फॉस्फरस, आर्यन आणि व्हिटॅमिन ‘सी’, व्हिटॅमिन ‘बी’ आणि व्हिटॅमिन ‘ई’ असते. जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात.

  • कढीपत्त्याची पाने रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ही पाने वाटून त्यांची पेस्ट बनवा. कोरड्या त्वचेसाठी ही पेस्ट चांगली आहे.
  • कढीपत्त्याची काही पाने वाटून घ्या. त्यात तुम्ही तुमच्या केसांच्या लांबीनुसार दही घाला. तयार मिश्रण केसांना लावल्यानंतर तुम्हाला एकदम थंड वाटेल. हे मिश्रण २० ते ३० मिनिटे ठेवून केस स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. आठवड्यातून एकदा हे मिश्रण केसांना लावा.
  • या पेस्टने बॉडीला मसाज केल्यास त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात, तसेच जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर, कढीपत्त्याच्या पानांची पावडर करुन नियमित ३ ते ४ ग्रॅम सकाळी आणि संध्याकाळी त्याचे सेवन केल्यास हा त्रास कमी होतो.
  • कढीपत्त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्यास सौंदर्यात भर पडते. कढीपत्त्याच्या वापराने मुरुमं तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

महत्वाच्या बातम्या – 

आरोग्य मुख्य बातम्या विशेष लेख

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon