भारतीय मसाल्याचे पदार्थ औषधी आहेत, हे आपण जाणतोच. लवंग हा असाच एक मसाल्याचा औषधी पदार्थ. लवंग दिसायला अगदी छोटीशी असली. तरी त्याचे औषधी गुणधर्म जबरदस्त आहेत. जाणून घेऊया लवंगाचे आरोग्यदायी फायदे…
- लवंगातील गॅस्ट्रिक रसामुळे पचनक्रिया सुधारते. यासाठी २ लवंग किसून ते अर्धा कप पाण्यात घालून उकळवा. त्यानंतर पाणी थंड झाल्यावर ते प्या. असे रोज तीन वेळा केल्याने गॅसची समस्या दूर होण्यास मदत होईल. गॅस, जळजळीसारख्या समस्यांवर गुणकारी ठरेल.
- आजकाल टुथपेस्टमध्ये लवंग हा प्रमुख घटक असतो. याचे कारण म्हणजे दातांचे दुखणे दूर करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते. दात खूप दुखत असल्यास कापसावर लवंगाचे तेल घेऊन ते दुखत असलेल्या दाताला लावा. दातदुखी पळून जाईल.
- आयुर्वेदात मधुमेहावर लवंग लाभदायी असल्याचे सांगितले आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी लवंग लाभदायी ठरते.
- तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी लवंगाचा फायदा होतो. लवंगाचा नियमित वापर केल्यास या समस्येपासून सुटका मिळेल. रोज सकाळ-संध्याकाळ दोन-तीन लवंग चघळल्यास खोकला दूर होईल आणि तोंडाची दुर्गंधीही दूर होईल.
- शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लवंग अतिशय फायदेशीर ठरेल. कारण त्यामुळे इंफेक्शन आणि सर्दी-खोकल्यावर आराम मिळेल. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल. लवंगात असलेल्या अँटी ऑक्सीडेंटमुळे त्वचा उजळते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढीस लागते.
महत्वाच्या बातम्या –
- प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा केंद्राचा हिस्सा लवकर द्यावा – कृषीमंत्री दादाजी भुसे यांची केंद्रीय कृषिमंत्री यांच्याकडे मागणी
- कोविड काळात ऑनलाईन शिक्षणात महाराष्ट्र आघाडीवर
- ‘माविम’च्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय – यशोमती ठाकूर
- दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांनी दर्जेदार सेवा द्यावी – आदिती तटकरे
- दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी पावले उचलण्याची दादाजी भुसे यांनी केली मागणी