नागपूरमध्ये २०१९ मध्ये ४७ शेतकऱ्यांची आत्महत्या

उत्पन्नात वाढविण्यासोबत शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध योजना, उपक्रम राबविण्यात येत आहे. कर्जमाफीही देण्यात आली. त्यानंंतरही शेतकरी आत्महत्या होत आहे. वर्ष २०१९ मध्ये एकट्या नागपूर जिल्ह्यात ४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.

थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता का जाणवते ?(

यातील २० आत्महत्या या मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले.या योजनांचा किती फायदा होतो, हा प्रश्नच आहे. कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेचाही फारसा होत असल्याचे दिसत नाही. कर्जमाफीनंतर जवळपास सव्वाशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील ४४ आत्महत्या या मदतीस पात्र ठरविण्यात आल्या. २० शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. तर ९ प्रकरण प्रलंबित असून १८ प्रकरण मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आले.

साखरेची विक्री किंमत वाढविण्यासाठी पाठपुरावा सुरू

तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शेतकरी आत्महत्या मदतीची रक्कम पाच लाख रुपये करण्याची घोषणा सभागृहात केली होती. मात्र चार वर्ष होत असताना अद्याप त्यात वाढ करण्यात आली नाही, ही घोषणा प्रत्यक्षात कधी अंमलात येणार हाही प्रश्नच आहे.