महाविकास आघाडीच्या सरकारकडून शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलं होती. मात्र आता ही कर्जमाफी फसवी असल्याचे आरोप होताना दिसत आहे.
स्विगी ऍपने प्रदर्शित केली ग्राहकांच्या फेव्हरेट फूडची यादी
सरकारने केलेली कर्जमाफी फक्त 2 लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच मिळणार आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम असलेल्या शेतकरी अपात्र राहणार आहे. ठाकरे सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयात केलेल्या उल्लेखा नुसार, राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची मुद्दल व व्याजासह दिनांक 30 .09.2019 पर्यंत थकबाकीची रक्कम 2 लाखांपेक्षा जास्त असेल अशी कर्जखाती कर्जमुक्तीच्या लाभास पात्र ठरणार नाही, असा उल्लेख करण्यात आला आहे.
अवकाळी पावसामुळे संत्र्याचा आंबिया बहर अडचणीत
ज्या शेतकऱ्यांवर 2 लाख किंवा त्यापेक्षा कमी कर्ज असेल त्यांनाच ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर त्यापेक्षा जास्त रक्कम असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे..
व्हॉट्सअॅप मध्ये आलं खास फीचर; नवीन फीचरमुळे डोळ्यांचा त्रास होणार कमी https://t.co/WMUlWxd0HR
— KrushiNama (@krushinama) December 27, 2019
पिकांना मुलद्रव्य देण्याकरता वायरलेस सेन्सरची निर्मिती, चक्रधर बोरकुटे यांचा नवा शोध https://t.co/4wiOxHnNpE
— KrushiNama (@krushinama) December 27, 2019