चिक्कू खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही आवडीने पुन्हा पुन्हा खाल चिक्कू!

आवडीने खाल्लं जाणारं फळ म्हणजे चिक्कू. लहान असोत वा मोठे सर्वांना चिक्कू खाणं आवडतं. चिकू थंड, पित्तनाशक, पौष्टिक, गोड फळ आहे. चिकूच्या सेवनाने हृदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण मिळते. चला तर मग जाणून घेऊ फायदे…..

चिकूमध्ये जास्त प्रमाणत फायबर आढळते. गर्भावस्थेमध्ये लाभदायक कार्बोहायड्रेट आणि पोषक तत्त्वांची चांगली मात्रा प्राप्त करण्यासाठी चिकू लाभदायक आहे. प्रसूतीनंतर अंगावर जास्त प्रमाणात दूध येण्यासाठी हे फळ उपयुक्त आहे.

पित्तनाशक गुणधर्म असल्याने जेवणानंतर हे फळ खाल्ले जाते. तसेच हृदयासंबंधी आजारापासून संरक्षण करते. हाडांच्या मजबूतीसाठी सर्वात जास्त गरजेचे असतात ते कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि आयर्नसारखे मिनरल्स. चिक्कूमध्ये हे सर्व मिनरल्स आढळतात.

त्यामुळे हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही आजच चिक्कूचं सेवन करायला सुरुवात करा. लहान मुलांना हे फळ जास्तीत जास्त खायला द्यायला हवं, जेणेकरुन त्यांच्या हाडांचा विकास चांगला होईल.

महत्वाच्या बातम्या –