कुळीथ
हलकी व मध्यम माळरानाची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड टाळावी.
उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी.
- हेक्टरी ५ टन शेणखत / कंपोस्ट खत द्यावे. मृगाचा पाऊस झाल्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात.
- हेक्टरी बियाणे प्रमाण : १२ ते १५ किलो.
- पेरणी अंतर : दोन ओळीत ३० सें.मी. व दोन रोपात १० सें.मी. ठेवावे.
- बीजप्रक्रिया – १ किलो बियाण्यास २ ग्रॅम थायरम + २ ग्रॅम कार्बेन्डेझीम चोळावे यानंतर २५० ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धन १० ते १५ किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.
- १२-१५ किलो नत्र आणि २५-३० किलो स्फुरद या प्रमाणे रासायनिक खताची मात्र द्यावी. म्हणजेच ७५ किलो डीएपी प्रति हेक्टर प्रमाणे पेरणी करताना खत द्यावे.
- पीक २०-२५ दिवसाचे असताना पहिली कोळपणी आणि ३० ते ३५ दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी.
- पेरणीनंतर ३० ते ३५ दिवस पीक तणविरहीत ठेवावे.
- सुधारित वाण :
अ.नं. |
वाण |
प्रसाराचे वर्ष |
पिकाचा कालावधी (दिवस) |
उत्पादन क्विं./हे. |
वैशिष्ट्ये |
लागवडीचा प्रदेश |
कुळीथ वाण | ||||||
१. | सीना | १९८४ | ११५ – १२० | ७ – ८ | फिक्कट रंगाचे तपकिरी दाणे,
पिवळा विषाणू रोगास प्रतिकारक्षम |
पश्चिम
महाराष्ट्र |
२. | माण | १९८६ | १०० – १०५ | ६ – ७ | गर्द लालसर रंगाचे दाणे,
उभट वाढ |
पश्चिम
महाराष्ट्र |
महत्वाच्या बातम्या –
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या मुसळधार पाऊस पडणार
- राज्यभरातील शाळांचे रूप पालटणार; राज्य सरकारने ‘हा’ मोठा निर्णय
- येत्या 4 ते 5 दिवसात राज्यात विजांच्या कडकडासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
- लसीकरणात महाराष्ट्राचा ‘महाविक्रम’; एका दिवसात तब्बल ‘इतक्या’ नागरिकांचे झाले लसीकरण
- राज्यात उद्यापासून तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी