नवी दिल्ली – देशातील कोरोनाचं संकट अद्यापही गेलेलं नाही. तिसऱ्या लाटेच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. सरकारकडून यावर उपाय योजना केल्या जात असतानाच आता देशात आणखी एक नवं संकट उभं ठाकलं आहे. कोरोना नंतर आता निपाह या व्हायरसने आता पुन्हा डोकं वर काढलं आहे. केरळमधील १२ वर्षीय मुलाचा या निपाहमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.
दरम्यान आता तमिळनाडूमध्येदेखील या व्हायरसचा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे यंत्रणा सावध झाल्या असून केंद्र सरकारनं तातडीनं एक पथक केरळला पाठवलं आहे. दक्षिण भारतात निपाहचा शिरकाव व्हायला सुरुवात झाली असून सर्व संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.
तमिळनाडूच्या कोइमतूरमध्ये एका रुग्णाला निपाह व्हायरसची लागण झाल्याचीं माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानंतर सर्व रुग्णालयांमध्ये सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून जास्त ताप असणाऱ्या प्रत्येक रुग्णाची निपाह चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निपाह व्हायरस काय आहे?
- या व्हायरसची निर्मिती अत्यंत सहज होते. प्राणी आणि माणसांमध्ये हा गंभीर आजार जन्म घेतो.
- हा व्हायरस वटवागुळात असतो.
- १९९८ मध्ये मलेशियाच्या कम्पंग सुंगाई निपाहमधून या व्हायरसचा शोध लागला होता. तेच नाव या व्हायरसला देण्यात आले.
- २००४ मध्ये बांग्लादेशातून काही लोकांना या व्हायरसची लागण झाली.
- सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अंड प्रिव्हेंशन (CDC)नुसार, निपाह व्हायरसचे इंफेक्शन एंसेफ्लाइटिसशी संबंधित आहे. त्यामुळे मेंदूचे नुकसान होते.
लक्षणं काय आहेत?
- हा व्हायरस थेट संसर्ग झालेल्या माणसाच्या, प्राण्याच्या संपर्कात आल्यास होऊ शकतो.
- हा व्हायरस मेंदूवर थेट हल्ला करतो. त्यामुळे ताप, थकवा, बेशुद्धावस्था अशी लक्षण आढळतात.
- लक्षण आढळताच तात्काळ उपचार न घेतल्यास पुढील 24-48 तासामध्ये संबंधित व्यक्ती कोमामध्ये जाण्याची शक्यता असते.
- अनेक रूग्णांमध्ये मेंदूशी निगडीत, श्वासोश्वासाशी निगडीत आणि हृद्याच्या ठोक्याशी निगडीत समस्या वाढल्याचे निदर्शनास आले.
- ताप, थकवा, शुद्ध हरपणे, चक्कर येणे, उलट्या होणे, मळमळणे, अस्वस्थ वाटणे ही लक्षणे 7-10 दिवस आढळतात.
- सुरूवातीच्या टप्प्यावर श्वासाशी संबंधित काही त्रास होतोय का? हे तपासून पाहणे अत्यावश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या –
- मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत विविध निर्णयांना मान्यता
- कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या मुसळधार पाऊस पडणार
- राज्यात उद्यापासून तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
- २०२० पर्यंतची गुंठेवारी नियमित करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करा – एकनाथ शिंदे