राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यात २७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अखेरपर्यंत तब्बल १५७ साखर कारखान्यांनी ऊसाचा गाळप सुरू केले आहे. तर यामध्ये राज्यातील ८२ खासगी व या मध्ये राज्यातील ७५ सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. तर राज्यात २७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत तब्बल १९५.८६ लाख टन उसाचे गाळप तयार करण्यात आले आहे.
राज्यात २७ नोव्हेंबर पर्यंत तब्बल १७६.५८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. अशी माहिती मिळाली आहे, तर राज्याचा सरासरी साखर उतारा ९ टक्के इतका आहे.
राज्यात २७ नोव्हेंबरपर्यंत सर्वाधिक ३७ साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरु झाले आहेत. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, राज्यात २७ नोव्हेंबर अखेरपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल ४६.५१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ३८.०६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील साखर उतारा ८.१८ टक्के आहे.
- मोठी बातमी – मुंबईतील शाळा १ डिसेंबरपासून नाही तर ‘या’ तारखेपासून सुरू होणार
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
- ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ‘या’ जिल्ह्यात पुन्हा निर्बंध
- अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देणार – विजय वड़ेट्टीवार
- पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी
- मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. २९ नोव्हेंबर २०२१