मोठी बातमी – मुंबईतील शाळा १ डिसेंबरपासून नाही तर ‘या’ तारखेपासून सुरू होणार

मुंबई:  ओमायक्रॉन व्हेरियंटने (Omicron) एन्ट्री घेतल्याने शाळांबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला. राज्य सरकारने अखेर १ डिसेंबरपासून पहिलीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आता शाळा सुरू होणार की नाही अशा संभ्रमात विद्यार्थी व पालक होते. मात्र आता या पार्श्वभूमीवर मुंबई (Mumbai) प्रशासनाने शाळा उघडण्यासाठी नवीन तारीख जाहीर केली आहे.

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे ( Omicron) पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षण आयुक्तांनी शाळा सुरु करण्याबाबत मनपा आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर मुंबई मनपाने निर्णय घेतला आहे. मुंबईत पहिली ते सातवीच्या शाळा आता १५ डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. तसा निर्णय घेण्यात आला आहे. पालकांची संमती असेल तर मुलांना शाळेत पाठविण्याची अट आहे त्याच सोबत ऑनलाईन शाळा सुरु राहणार आहेत.

पहिली ते सातवी शाळा सुरू करण्यावर सध्यातरी शिक्षण विभाग ठाम आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्यात. शाळेचा सर्व परिसर निर्जंतूक केलेला असावा. सर्व कर्मचाऱ्यांनी दोन्ही डोस तातडीने पूर्ण करावेत. विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क देण्यात यावेत. विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. सामूहिक खेळ खेळण्यास तसेच एकत्र डबा खाण्यास मनाई करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –