पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत २०१५-१६ मध्ये आपल्या नावावर २४ हजार ४०० रुपये अनुदान उचल्याची तक्रार पूर्णा तालुक्यातील एका शेतकऱ्याने केली. कृषी सहायक श्याम यसमोड, हरीश वंजे अशी संशयितांची नावे आहेत. त्यानंतर या प्रकरणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञातांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारींची व्याप्ती वाढत गेल्यानंतर जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्ये यांच्या आदेशानंतर पोलिसांची तपास करण्याची गती वाढली. आता पर्यंतच्या तपासात ४ हजारांवर पानांचे पुरावे पोलिसांनी जमा केले. ३०६ बनावट प्रस्ताव सादर केले असल्याचे उघडकीस आले.
पंतप्रधान सिंचन योजनेअंतर्गत २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नावाने ठिंबक सिंचन संचाचे बोगस प्रस्ताव सादर करून २९ लाख ७९ हजार ५१७ रुपयांच्या अनुदानाचा अपहार झाल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी एका कृषी सहायकासह दोघांना अटक केली. त्यांना शनिवारपर्यंत (ता. ३) पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
तत्कालीन तालुका कृषी अधिकारी आणि दोन कृषी सहायक अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन तालुका कृषी अधिकारी आणि दोन कृषी सहायक फरार आहेत. या प्रकरणाचा तपास फौजदार चंद्रकांत पवार नितीन वडकर, विष्णू भिसे करत आहेत.
विहीर, कूपनलिका असा कोणत्याही प्रकारचा सिंचन स्रोत नसलेल्या, काही निधन झालेल्या शेतकऱ्यांच्या नावाने असा बोगस प्रस्ताव तयार करून, ताडकळस येथील बॅंकेत बोगस बॅंक खाते उघडले. हरीश वंजे याच्यासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ७२ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर जमा झालेले ठिबक सिंचन संचाचे २९ लाख ७९ हजार ५१७ रुपयांच्या अनुदानाची रक्कम स्वतःच्या खात्यावर वळती केल्याचे समोर आले आहे.
महत्वाच्या बातम्या –
आता होणार भात लावणीच्या कामातून मजुरांची सुटका ; हरणगावात स्वयंचलित भात लावणी यंत्राचे प्रात्यक्षिक
शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरण्यासाठी मोफत सामायिक सुविधा केंद्र