ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘शरद शतम् योजना’; टास्क फोर्सचा अहवाल सादर

मुंबई – राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत आरोग्य तपासणीसंदर्भात प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘शरद शतम्’ आरोग्य योजनेची कार्यपद्धती व समाविष्ट करावयाच्या आरोग्य तपासण्या यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला असून या योजनेला मंत्रिमंडळ मान्यतेसाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश … Read more

उच्चस्तरीय चौकशीचा अहवाल आठ दिवसांत सादर करा – राजेश टोपे यांच्या सूचना

अहमदनगर – अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून आठ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या प्रकारच्या घटना वारंवार होऊ नये. यासाठी फायर सेफ्टी ऑडिटसाठी वेगळा निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद केली जाईल. सर्व जिल्हा रुग्णालयांच्या आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारीचा आढावा घेण्यात येईल, अशी माहिती … Read more

जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध होण्यासाठी आराखडा सादर करावा – के.सी.पाडवी

नंदुरबार – जिल्ह्यातील स्थलांतराचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यातच रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी आराखडा सादर करावा, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध विषयावर करावयाच्या उपाययोजनांबाबत  आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, सहायक … Read more

सर्व शासकीय यंत्रणांनी 30 ऑक्टोबर पर्यंत प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत – दत्तात्रय भरणे

सोलापूर – जिल्हा नियोजन समितीच्या वतीने मंजूर करण्यात आलेला निधी शंभर टक्के खर्च झाला पाहिजे. यासाठी विविध विकास कामांचे प्रस्ताव तयार करून ते तात्काळ प्रशासकीय मान्यतेसाठी दिनांक 30 ऑक्टोबर 2021 पर्यंत सादर करावेत, असे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या शासकीय विभाग प्रमुखांच्या बैठकीत पालकमंत्री भरणे बोलत … Read more

तीर्थक्षेत्रांचा दर्जा वाढविण्याबाबत परिपूर्ण प्रस्ताव सादर करा – अब्दुल सत्तार

औरंगाबाद – खुलताबाद येथील हजरत शेख मुन्तजबुद्दीन जर जरी बक्ष आणि भद्रा मारोती येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. ह्या दोन तीर्थक्षेत्रांच्या दर्जात वाढ करण्याच्या अनुषंगाने पालिकेने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा असे आवाहन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार  यांनी केले आहे. खुलताबाद येथे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, … Read more

कांदा पीक मूल्यसाखळी बळकटीसाठी ऑप्रेशन ग्रीन योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करावेत – कृषीमंत्री

मालेगाव – कांदा पिकातील मुल्यसाखळी बळकट करण्यासाठी ऑप्रेशन ग्रीन योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करत, कांदा पिकाचे तालुक्यातील क्षेत्र लक्षात घेता मोठ्या प्रमाणात कांदाचाळ उभारणी हाती घेणे गरजेचे असून यासाठी शासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. असे आश्वासन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. शासकीय विश्रामगृह मालेगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या … Read more

आता गोदावरी नदीचा पूर ओसरल्याने , येत्या तीन दिवसांत पंचनामे सादर करण्याचे आदेश

गोदावरीला आलेल्या पुरामुळे वैजापूर तालुक्‍यातील १७ तसेच गंगापूर तालुक्‍यातील ९ वाड्या वस्त्यांमध्ये पाणी घुसले होते. पुराचा धोका ओळखून वैजापूर तालुक्‍यातील ९४२, तर गंगापूर तालुक्‍यातील ३८९ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. पुराच्या पाण्यामुळे वैजापूर तालुक्‍यात नदीकाठची अंदाजे तीन हजार हेक्‍टरवरील शेतातील पिके ही पाण्याखाली गेली. गोदावरी नदीचा पूर आता ओसरला आहे. पण या पुरामुळे शेतकऱ्यांचे … Read more

ठिंबक सिंचन संचाचे बोगस प्रस्ताव सादर करून २९ लाख ७९ हजार ५१७ रुपयांच्या अनुदानाचा अपहार

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत २०१५-१६ मध्ये आपल्या नावावर २४ हजार ४०० रुपये अनुदान उचल्याची तक्रार पूर्णा तालुक्यातील एका शेतकऱ्याने केली. कृषी सहायक श्‍याम यसमोड, हरीश वंजे अशी संशयितांची नावे आहेत. त्यानंतर या प्रकरणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञातांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारींची व्याप्ती वाढत गेल्यानंतर जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्ये यांच्या … Read more