आता होणार भात लावणीच्या कामातून मजुरांची सुटका ; हरणगावात स्वयंचलित भात लावणी यंत्राचे प्रात्यक्षिक

पेठ तालुक्यात बहुतांश भात व नागली पिके घेतली जात असून, भात पिकाची पेरणीपासून तर लावणीपर्यंत मशागत करावी लागते. या तंत्रज्ञानामुळे गुडघाभर चिखलात उभे राहून भाताची लावणी करण्यापासून मजुरांची आता सुटका झाली असून, वेळ व पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.

भात लावणीच्या कष्टाच्या कामातून मजुरांची सुटका करत स्वयंचलित भात लावणी यंत्राचा वापर केला जाऊ लागला आहे.

पारंपरिक शेतीच्या मशागतीला फाटा देत आदिवासी बळीराजाने आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची कास धरली असून, आता भात लावणीच्या यंत्राचा वापर केला जाऊ लागला आहे. तालुका कृषी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

तालुका कृषी अधिकारी शीलानाथ पवार यांनी आदिवासी शेतकऱ्यांना सकारात्मक ऊर्जा देत आधुनिक शेतीकडे आकर्षित केले. हरणगाव येथे प्रत्यक्ष शेतात भात लावणीचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

महत्वाच्या बातम्या –

पीकविमा अर्ज भरण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सुविधा केंद्र सुरू – अनिल बोंडे

शेतकऱ्यांचे हाल ; कृषी कार्यालयाचा परमीट देण्यास नकार

नव कल्पनांनी युक्त बाजारपेठेचा विकास करण्यासाठी उद्योजकांनी एकत्र यावे – देवेंद्र फडणवीस