Maida Side Effects | टीम कृषीनामा: आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मैदा आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग बनला आहे. मैद्यापासून बनवलेले समोसा, कचोरी, पुरी इत्यादी पदार्थ बहुतांश लोकांना खायला आवडतात. त्याचबरोबर पिझ्झा, बर्गर, ब्रेड यांसारख्या फास्ट फूडमध्ये देखील मैद्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तुम्ही पण जर हे पदार्थ खाण्याचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण मैद्याचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला काही दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. त्याबद्दलच आम्ही आज या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहोत. मैद्याच्या पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्याला पुढील दुष्परिणाम बघावे लागू शकतात.
पचन समस्या (Digestive problems-Maida Side Effects)
तुम्ही जर मैदानाचे जास्त प्रमाणात सेवन करत असाल, तर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. मैदा आतड्यांसाठी अत्यंत हानिकारक मानला जातो. कारण मैद्यामध्ये फायबर नसल्यामुळे ते सहज पचत नाही. त्यामुळे मैद्याचे अतिरिक्त सेवन केल्याने बद्धकोष्ठता, अपचन, ऍसिडिटी यासारख्या पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
पोषक तत्वांची कमतरता (Nutrient deficiency-Maida Side Effects)
मैद्याचे अतिरिक्त सेवन केल्याने शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. गव्हाचा बाहेरील थर काढून मैदा तयार केला जातो. मैदा तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये पोषक तत्वे आणि फायबर नष्ट होऊन जाते. त्यामुळे तुम्ही जर नियमित मैद्याचे सेवन करत असाल तर तुमच्या शरीरात विटामिन, मिनरल्स इत्यादी पोषक तत्वांची कमतरता भासू शकते.
रक्तातील साखरेची पातळी वाढते (Blood sugar levels rise-Maida Side Effects)
जास्त प्रमाणात मैद्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. मैद्याचे जास्त सेवन केल्याने रक्तात ग्लुकोज जमा होते, जे मधुमेहाची समस्या वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे तुम्ही जर डायबिटीसचे रुग्ण असाल, तर तुम्ही मैदा खाणे टाळले पाहिजे.
कोलेस्ट्रॉल वाढते (Cholesterol increases-Maida Side Effects)
मैद्याचे जास्त सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते. मैद्यामध्ये जास्त प्रमाणात स्टार्च आढळून येते, ज्यामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होऊ शकते. मैद्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मैद्याचे अति सेवन करण्यात आले पाहिजे.
टीप: वरील माहितीसाठी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या