मोठी बातमी – तूरडाळीच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ

तूरडाळीचे भाव गेल्या दोन महिन्यांत 20 टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या बाजारात तूरडाळीचे भाव प्रति किलो 90 ते 110 रूपये या दरम्यान आहेत. तुरीच्या उत्पादनात घट झाल्यामुळे सध्या तुटवडा पडत आहे.

गेल्या वर्षी तुरीचे उत्पादन कमी झाल्यामुळे आणि खरेदीचे प्रमाण वाढल्यामुळे यंदा तुरीची टंचाई जाणवत आहे. कृषी खात्याच्या आकडेवारीनुसार देशात 2018-19 मध्ये 36.8 लाख टन तुरीचे उत्पादन झाले. त्या आधीच्या वर्षी 40.2 लाख टन तूर उत्पादन झाले होते. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू इत्यादी राज्यांत दुष्काळामुळे तूर पिकाला मोठा फटका बसला. तसेच सलग दोन वर्षे केंद्र सरकारने तुरीचे दर कमी राखण्यासाठी जी धोरणे राबवली, त्यामुळे तुरीचा पेराही कमी होत गेला.

या सगळ्यांचा परिणाम म्हणून यंदा तुरीच्या उपलब्धतेत मोठी घट झाली आहे. त्यामुळे देशभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये तुरीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. परंतु तूरडाळीचे दर आणखी वाढू नयेत, यासाठी सरकार शक्य ते सगळे प्रयत्न करेल. त्यामुळे ही भाववाढ तात्पुरती आहे, असे मत कडधान्य आयातदार व व्यापारी एस.पी.गोयंका यांनी सांगितले.

तूरडाळीचे दर अधिक वाढू नयेत, यासाठी केंद्र सरकारने निर्णयांचा सपाटा लावला आहे. त्यानुसार सरकारने दोन लाख टन तूर आय़ात करण्याच्या हालचाली वेगवान केल्या आहेत. तसेच मोझंबिकातून पावणे दोन लाख टन तूर आयात होणार आहे. त्याच प्रमाणे सरकारने नाफेडला दोन लाख टन तूर बाजारात आणण्यास सांगितले आहे.

चवळी लागवड पद्धत

कोबीला भावच नाही ;शेतकऱ्याने फिरवला सात एकर शेतीवर नांगर

शेळ्यांची निवड- शेळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खरेदी कराव्यात