खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेती उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी बहुतांश शेतकरी शेतात शेणखत टाकतात. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेणखताच्या दरात मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. मागील वर्षी झालेल्या पावसामुळे खरीप हंगामामध्ये अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांना घेता आले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत.आता त्यात रासायनिक खतांच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. शेती उत्पन्न वाढीसाठी शेतकरी शेणखताचा उपयोग करतात. आता मात्र शेणखताच्या दरात वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी एक ट्रॅक्टर शेणखतासाठी शेतकऱ्यांना अडीच हजार रुपये मोजावे लागत होते. परंतु यावर्षी शेणखताचे दर साडेतीन हजार ते चार हजार रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत. दिवसेंदिवस शेतीबरोबर पशुपालन व्यवसाय कमी आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे काही शेतकरी आपले पशुधन विक्री करीत आहेत. परिणामी पशुधन संख्या झपाट्याने कमी होत असल्याने शेणखताच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
सेंद्रीय खतांचे हे आहेत फायदे
जमिनीचा पोत सुधारतो, सुपीकता वाढते. जमिनीतील ह्युमसचे प्रमाण वाढल्याने जमीनीची जलधारण क्षमता वाढते त्यामुळे सिंचनाचा खर्च कमी होतो तसेच पाण्याची बचत होते. पर्यावरणातील प्रदूषण कमी होण्यास हातभार लागतो. नायट्रोजन, फोस्फोरस आणि पोत्याशीयम सारखी मुलद्रव्ये भरपूर प्रमाणात मिळतात. पिकाच्या निरोगी वाढीमुळे कीटकनाशक फवारण्या वाचतात. गांडुळांचा जमिनीतील वावर वाढतो. जमीनीची सुपीकता वाढण्यासाठी सक्षम पर्याय म्हणुन कंपोस्ट खताकडे पहिले जाते. कंपोस्ट खत ही कमी वेळेत आणि कमी खर्चात तयार होणारी पद्धत आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे खतांची दरवाढ
पशुधन संख्या जास्त असली तरीही यंदा पाणी चारा टंचाईमुळे अनेक पशुपालक आपले पशुधन विक्री करीत आहेत. त्यामुळे पशुधनाची संख्या कमी होत आहे. परिणामी शेणखताच्या दरात वाढ झाली.
प्रदूषणमुक्त मिठी नदीमुळे मुंबई सुरक्षित – पर्यावरणमंत्री रामदास कदम