बोर लागवड व उत्पादने

भारतातील सध्याची शेती ही आधुनिकतेकडे येताना दिसत आहे.  कारण शेतकरी पारंपारीक शेतीचा किंवा ठरलेल्या पिकाच्या मागे न लागता नवनविन यंत्राचा वापर करुन वेगवेगळी पिके घेत आहेत. इतर वर्गातील पिकापेक्षा सध्या शेतकरी फळबाग पिकाची लागवड तेवढ्या प्रमाणात वाढलेली दिसत नाही. यामध्ये महत्त्वाचे फळबाग पिक म्हणजे बोर आहाराच्या दृष्टीने बोराला विशेष महत्त्व आहे. कारण बोरामध्य माणसाला आवश्‍यक असणारे अन्नघटक आढळतात तसेच ‘क’ जिवनसत्त्वाचे प्रमाण तर सफरचंदापेक्षाही जास्त आहे. त्यामुळे बोराची बाजारपेठेतील मागणी दिवसेनदिवस वाढत चालली आहे. तसेच बोर हे नाशवंत फळ असल्यामुळे त्यावरील प्रक्रिया उद्योगांना भारतामध्ये आता वेग आलेला आहे.

भारतामध्ये प्रामुख्याने हरियाना, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्र या राज्यामध्ये हे पिके मोठ्या प्रमाणात घेतले जाते. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यान अहमदनगर, धुळे बुलढाना, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यामध्ये हे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते बोर हे पिक क्षारयुक्त, आम्लयुक्त व खडकाळ, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत येते. तसेच बोरासाठी जास्त थंड हवामान किंवा जास्त आर्द्रता असलेले हवामान अनुकून नाही उष्ण वातावरणामध्ये बोराचे पिक चांगल्याप्रकारे येऊ शकते. भारतामध्ये प्रामुख्याने गोला, उमराण,बनारसी या जातींचा प्रामुख्याने लागवडीसाठी वापर केला जातो. यापैकी महाराष्ट्रामध्ये उमराण व कडला या जातींचा जास्तीत जास्त वापर केला जातो. अलिकडच्या काळामध्ये कलमाद्वारे तयार करण्यात आलेल्या ॲपलबोर या जातीची मोठ्याप्रमाणात लागवड केली जात आहे. या जातींच्या बोरामध्ये गर जास्त व बियाची आकार हा छोटा आहे तसेच हि बोरे चवीला गोड आहेत व या बोरांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

बोरांची लागवड ही साधारणता मान्युनच्या सुरुवातीला केली जाते. कमी पावसाच्या ठिकाणी बोराची लागवड ही 6 मीटरवर व जास्त पावसाच्या ठिकाणी बोरांची लागवड हि 8 मीटर अंतरावर केली जाते. लागवड करतांना 60द60द60 या आकाराचे खड्डे घेवुन ते शेणखताने भरुन घ्यावेत त्याचबरोबर त्यामध्ये 50 ग्रॅम हेप्लाक्लोर पावडर मिसळावी. लागवडीनंतर 3 ते 4 आठवड्यच्या अंतराने पाणी द्यावे. फुलधारणेनंतर जवळ जवळ 150-175 दिवसांनी फळ काडणीस येते. दक्षिण भारतामध्ये काढणीची वेळ हि ऑक्टोबर-नोव्हेंबर व डिसेंबर-मार्च मध्ये गुजरात आणि फेब्रुवारी एप्रिलमध्ये उत्तर भारतात अशी आहे. मागील काही वर्षामध्ये लागवडीखालील क्षेत्र कमी असल्यामुळे बोरांना बाजारामध्ये चांगल्याप्रकारे भाव भेटत होते परंतु जसजसे बोर लागवडीचे क्षेत्र वाढत गेले तसतसे बोरांचे बाजार पेठेतील किंमत कमी होवु लागली त्यामुळे अलिकडच्या काळात बोर प्रक्रिया उद्योग चालु होत आहेत. त्यामुळे बाजारपेठेमध्ये बरीचशी बोर उत्पादने येवु लागली त्यातील काही उत्पादने खालील प्रमाणे….

बोर लोणचे – 

बोरापासुन बनविलेले लोणचे सध्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध असुन हे लोणचे बनविण्यासाठी पुर्ण पक्व झालेल्या परंतु हिरवा रंग असलेल्या फुलाची निवड केली जाते.

बोरांची चटणी – 

रोजच्या आहारामध्ये चटणीचे स्थान महत्त्वाचे आहे. बोरामध्ये अनेक आरोग्य वर्धक गणधर्म असल्यामुळे बोरापासुन चटणी बनविली जाते यासाठी किंचीत पिवळसर झालेल्या बोरांची निवड करावी. एक किलो बोराची किसापासुन साधारणता 1.5 ते 1.7 ग्रॅम चटणी तयार होते.

बोराची पावडर –

बोराची पावडर तयार करुन ती साठवता येऊ शकते. ज्यावेळेस बोरे बाजारात उपलब्ध होत नाही. त्यावेळेस या पावडराचा उपयोग आहारामध्ये विविध मार्गानी करता येतो.

बोराची टुरीफ्रुटी – 

आकाराने मोठ्या असलेल्या बोरांपासुन टुरीफ्रुटी तयार केली जाते. ज्याप्रमाणे आपण ओल्या खोबऱ्याचे तुकडे (टुरीफ्रुटी) करुन ते वेगवेगळे पदार्थ बनविण्यासाठी वापरले जातात तसेच बोरांचे तुकडे बनवुन त्याचा वापर केला, फ्रुटब्रेड, श्रीखंड तयार करण्यासाठी केला जातो.

मद्य/वाईन/निर्मिती – 

साधारणत: वाईन (मद्य) हे द्राक्ष, सफरचंद व इतर काही फळापासुन बनविले जाते परंतु अलिकडच्या काळामध्ये बोरामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे व उत्पादण वाढल्यामुळे बोरापासुन मद्यनिर्मिती होवु लागली आहे.

खजुर – 

मोठ्या आकाराच्या बोरापासुन अलिकडच्या काळामध्ये खजुर किंवा सुकामेवा बनवला जात आहे. यासाठी मोठ्या आकाराच्या बोरांची निवड केली जाते व ती स्वच्छ धुवून त्याला छिद्रे पाडली जातात व गरम पाण्यातुन काढुन त्यावर साखरेच्या पाकाची प्रक्रिया करताना अशाप्रकारची बोराची खजुर घरामध्ये बनवतात व सध्या अशी खजुर बाजारपेठेमध्ये सुध्दा उपलब्ध आहे.

महत्वाच्या बातम्या –