शेडनेट व हरितगृहातील फुलातील उत्पादन तंत्रज्ञान

सध्या फुलांच्या बाजारात गुलाब, जरबेरा, शेवंती कार्नेशन, अँथुरियम आणि ऑर्किडस इत्यादीची फुले चांगली किंमत मिळवुन देतात. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांकडुन या फुल पिकांच्या लागवडीस पसंती केली जाते. माती विरहीत माध्यमात, शेडनेट तसेच हरितगृह सारख्या नियंत्रित वातावरणात फुलशेती लागवड फारच यशस्वी ठरली आहे.

जमीन

शेडनेट व हरितगृहामध्ये फुलशेती लागवडीसाठी लाल रंगाची (लॅटेराईट प्रकारची) माती वापरणे आवश्‍यक असते. मातीचा सामु (कझ)6.5 ते 7 दरम्यान असावा. क्षारता 1 मिली लिटर होस प्रति सें.मी. पेक्षा कमी असावी. लागवडीसाठीसाठी 60% माती, 20% भाताचे तुस/वाळु, 20% शेणखत याचा माध्यमात वापर करावा. माध्यमाचे निर्जंतुकीकरणासाठी फॉरमॅलिन 0.2% किंवा बासमिड 40 ग्रॅम प्रती चौ.मी. क्षेत्रास वापरावे. हरितगृहामध्ये फुलपिकांची लागवड गादी-वाफ्यावर केली जाते. त्यासाठी योग्य लांबी (हरितगृहाच्या लांबीप्रमाणे) 1 ते 1.6 मी. रुंदी व 30 सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावे दोन वाफ्यात 50 ते 60 सें.मी. अंतर असावे.

हवामान

अंशत: नियंत्रीत वातावरणात फुलांचा रंग पाकळ्यांची संख्या फुलदांड्याची लांबी या बाबी तापमानावर अवलंबुन असतात. योग्य वाढीसाठी कमाल तापमान (दिवसा) 20 ते 25 अंश सें.ग्रे. तर किमान तापमान 18 ते 20 अंश सें.ग्रे. असावे सापेक्ष आर्द्रता 60 ते 70% असावी. कर्ब वायुची योग्य पातळी 1000 ते 3000 पीपीएम असावी. अशंत: नियंत्रित हरितगृहामध्ये फॉगिंग/मिस्टींग चा वापर करुन सापेक्षा आर्द्रता वाढविली जाते व तापमान त्यायोगे कमी केले जाते. उन्हाळ्यात 50% शेडनेट वापरुन सुर्यप्रकाशाची तीव्रता कमी करावी. तसेच हरितगृहाच्या झडपा दिवसा उघडुन संध्याकाळी बंद कराव्यात. त्यामुळे नैसर्गिक वायुविजन होऊन तापमानात घट येते.

लागवड

गुलाब :- या पिकाची लागवड मे-जुन महिन्यामध्ये जमिनीमध्ये साधारणत: 45द20 सें.मी. अंतरावर लागवड करावी. दोन ओळीत 30 ते 45 सें.मी. व दोन रोपात 15 ते 20 सें.मी. अंतर असावे. 6 ते 9 रोपे प्रती चौ.मी. क्षेत्रावर लावावीत.

जरबेरा :- गादी वाफ्यावर दोन ओळीत 30द30 सें.मी. अंतरावर रोपांची लागवड करावी. रोपांची संख्या 7 ते 9 प्रती चौ.मी.

कार्नेशन :- गादी वाफ्यावर जोड ओळीत लागवड करावी. लागवडीचे अंतर 15द15 सें.मी., 20द20 सें.मी. ठेवावे दोन जोड ओळीत 30 सें.मी. अंतर सोडावे रोपे जास्त खोल लावु नयेत. रोपांचा बुंधा जमीनीपासुन किंचीत वर ठेवल्यास मर रोग होत नाही.

आंतरमशागत

गुलाब :- या पिकात पाण्यातील अन्नद्रव्ये जोमाने वाढणाऱ्या फांद्याकडे पाठविण्यासाठी फांद्या जमिनीलगत 45 अंश कोनात वाकविणे, (बेंडिग) पानाच्या बेचक्यातुन वाढणाऱ्या कळ्या खुडणे (डिसबडिंग) फांदीवरील मुख्य कळी शेंड्यासह काढणे (टॉपिंग) इ. आंतरमशागतीचे कामे करावी लागतात.

जरबेरा :- गादी वाफे खुरपणी करुन जमीन भुसभुशीत ठेवावी. तसेच वाळलेली रोगट पाने, खराब कळ्यांची व फुलांची काढणी करावी.

कर्नेशन :- रोपांच्या लागवडीनंतर 25-30 दिवसांनी रोपांचा शेंडा खुडणे (पिंचींग) आणि फुलदांड्यावरील अनावश्‍यक कळ्या खुडणे (डिसबडिंग) इ. कामे करावी लागतात. तसेच कर्नेशनची फुले नाजुक व उंच वाटत असल्यामुळे जाळ्यात वापरुन आधार देणे आवश्‍यक असते.

खत व्यवस्थापन

गुलाब:- 10 किलो शेणखत + 30:30:20 ग्रॅम छ:झ:घ: प्रती चौ.मी. क्षेत्रास द्रव रुपात लागवडीनंतर 3 आठवड्यांनी द्यावे. नंतर 1 महिन्याच्या अंतराने सुरुवातीला 4 महिने विद्राव्य खते ठिबक सिंचनाद्वारे पुढील प्रमाणे द्यावीत

पहिला महिना – 100:100:100 – मि.ग्रॅ. प्र.लि. झाड/आठवडा

दुसरा महिना – 200:100:100 – मि.ग्रॅ. प्र.लि. झाड/आठवडा

तीसरा महिना -300:200:200 – मि.ग्रॅ. प्र.लि. झाड/आठवडा

चौथा महिना – 400:200:200 – मि.ग्रॅ. प्र.लि. झाड/आठवडा

जरबेरा –

चांगले कुजलेले शेणखत 10 किलो प्रती चौ.मी. या प्रमाणात मिसळुन द्यावे. सुरुवातीचे तीन महिने 10:15:20 ग्रॅम/चौ.मी./महिना व चौथ्या महिन्यापासुन 15:10:30 ग्रॅम/चौ.मी./महिना, चार आठवड्यात विभागुन द्यावे. याशिवाय सुक्ष्म अन्नद्रव्ये बोरॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस इ. प्रत्येकी 0.15% (1.5 मि.ली./लि.) महिन्यातुन एकदा द्यावे. खते ठिबक सिंचनाद्वारे दिल्यास झाडांची वाढ जोमदार होऊन भरघोस व दर्जेदार फुलांचे उत्पादन मिळते.

पाणी व्यवस्थापन

गुलाब :- पाण्याचा सामु 6.5 ते 7 दरम्यान असावा. तो जास्त असल्यास नायट्रिक ॲसिडचा वापर करुन योग्य करावा. 600 ते 750 मि.ली. पाणी/चौ.मी./दिवस

जरबेरा :- लागवडीनंतर लगेच तीन आठवड्यापर्यंत रोपांना झारीने पाणी द्यावे. त्यानंतर हळुहळु ठिबक सिंचनाकडे वळावे. जरबेरा रोपांची पाण्याची गरज सुमारे 700 मि.ली. प्रतिदिन इतकी असने.

कार्नेशन :- सुरुवातीच्या काळात तुषार व नंतर ठिबक संचातुन पाणी द्यावे. साधारणपणे प्रती चौरस मीटर ला 20-25 लि. पाणी दररोज द्यावे.

फुलांची काढणी

गुलाब :- कळी बट्ट अवस्थेत, अर्धवट उमलेला, पुर्ण रंग भरलेली आणि फुलांचा दांडा सुमारे 15 ते 20 इंच लांब असताना काढणी करावी. दांड्याच्या खालील भागातील पाने व काटे मशीनच्या सहाय्याने काढणीत.

जरेबरा :- पुर्णत: उमलेली फुले काढावीत. फुलांचे दांडे तळाशी धरुन आजुबाजुस वाकविल्यास बुडातुन तुटून येतात. ही काढणीची योग्य पध्दत आहे.

कार्नेशन :- कळी टपोरी वाढल्यानंतर पाकळ्यांचा रंग दिसतो परंतु पुर्ण उमललेली अवस्था नसते. अशा वेळी फुलांची, काढणी करावी.

उत्पादन

गुलाब – 150 ते 200 फुले/चौ.मी./वर्ष

जरबेरा – 150 ते 250 फुले/चौ.मी./वर्ष

कार्नेशन – 200 ते 250 फुले/चौ.मी./वर्ष

पिकांच्या जाती

गुलाब :- टॉप सिक्रेट (लाल), ताजमहाल (गुलाबी), अवलंच (पांढरा), गोल्ड स्ट्राईक (पिवळा),

जरबेरा :- दाना एलन (पिवडा), गोलीएथ (नारंगी), ड्युन (नारगी), सिल्व्हेस्टार (पांढरा) सॅल्व्हॅडॉर (लाल), प्रिमरोझ (गुलाबी)

कार्नेशन :- डोमिंगो, बाल्टीको, ग्वॉडीना, ऑरेंज फिरॅटो, सोलर, ताहिती.

महत्वाच्या बातम्या –