नवी दिल्ली – येणाऱ्या अर्थसंकल्पात (Budget) शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार याकडे आता सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. तसेच खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. यामुळे आता शेती करायची तरी कशी असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. यामुळे आता आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.
येत्या 1 फेब्रुवारी 2022 रोजी मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकाळातील चौथा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. यामध्ये आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकर्यांना देण्यात येणार्या वार्षिक रकमेत वाढ होऊ शकते. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकर्यांना वार्षिक 6,000 रुपये देते. आता या बजेटमध्ये ही रक्कम वाढवली जाऊ शकते. यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागले आहे.
पीएम किसान (PM Kisan) सन्मान निधी योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकर्यांना वार्षिक 6,000 रुपये देते मात्र आता ही रक्कम आता ८००० एवढी केली जाऊ शकते. देशात सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर देशातील शेतकर्यांचा शेतीचा खर्च वाढला आहे. डिझेल ते खते आणि बियाणांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत आहे. तसेच शेतकऱ्यांवर अनेक नैसर्गिक संकटे येत आहेत. यामुळे याबाबत मोदी सरकार विचार करत असल्याचे सांगितले जात आहे.
यंदा सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कमी व्याज दरावर कर्ज, शेती क्षेत्रासाठी नवतंत्रज्ञान, कृषी पायाभूत सुविधा, वेगवेगळी पिके, यूरिया वरील अवलंबित्व कमी करणे या सारख्या मुद्द्यावर निर्णय होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या –
- दिलासा! देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ
- खुशखबर! आता मजुरांना मिळणार दरमहा 3000 रुपये पेन्शन, कसा करावा अर्ज जाणून घ्या फक्त एका क्लीकवर….
- शाळेची घंटा वाजणार! राज्यातील ‘या’ १५ जिल्ह्यांमध्ये आजपासून शाळा सुरू
- राज्यात 3 ते 4 दिवस थंडीचा कडाका वाढणार; मुंबईत पारा आणखी घसरण्याची शक्यता
- कडाक्याच्या थंडी आणि धुक्यामुळे रेल्वेने 481 गाड्या केल्या रद्द
- कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन करावे – छगन भुजबळ