Budget २०२२: राज्यातील शेतकऱ्यांना केंद्रीय अर्थसंकल्पात काय अपेक्षा आहेत?

नवी दिल्ली –  येणाऱ्या अर्थसंकल्पात (Budget) राज्यातील शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार याकडे आता सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसामुळे  राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. तसेच खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे.  यामुळे आता शेती करायची तरी कशी असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. यामुळे आता आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सर्व राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पातून राज्यातील  शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

अवकाळी पाऊस , मोदी सरकारने रद्द केलेले कृषी कायदे, खतांच्या किमती यावरून हा अर्थसंकल्प गाजणार आहे. कृषी क्षेत्रावर सध्या अनेक मोठी संकटे आहेत. यासाठी यावर मात करण्यासाठी कृषी क्षेत्रावर मोठी तरतूद करण्याची गरज अनेकांनी बोलून दाखवली आहे. देशातील 90 टक्के शेतकऱ्यांकडे दोन एकरपेक्षा कमी क्षेत्र आहे. शेतीतून मिळणाऱ्या अल्प उत्पन्नामुळे घरगाडा हाकणे कठीण झाले आहे. यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी काय योजना सरकार आखणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर अल्पभूधारक आहेत. ते सध्या अनेक अडचणीचा सामना करत आहेत.

येत्या 1 फेब्रुवारी 2022 रोजी मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील चौथा अर्थसंकल्प  अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. यामध्ये आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या वार्षिक रकमेत वाढ होऊ शकते. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकर्‍यांना वार्षिक 6,000 रुपये देते. आता या बजेटमध्ये ही रक्कम वाढवली जाऊ शकते. यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागले आहे.

पीएम किसान (PM Kisan) सन्मान निधी योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकर्‍यांना वार्षिक 6,000 रुपये देते मात्र आता ही रक्कम आता ८००० एवढी केली जाऊ शकते. देशात सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर देशातील शेतकर्‍यांचा शेतीचा खर्च वाढला आहे. डिझेल ते खते आणि बियाणांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत आहे.  तसेच शेतकऱ्यांवर अनेक नैसर्गिक संकटे येत आहेत. यामुळे याबाबत मोदी सरकार विचार करत असल्याचे सांगितले जात आहे.

खतांच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. यामुळे शेतीचे आर्थिक गणित विस्कटले आहे. यामध्ये देखील कपात करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. गेल्या एकाच महिन्यात अनेक खतांच्या किमती तब्ब्ल दुप्पट वाढल्या आहेत. यामुळे यामध्ये दिलासा देण्याची मागणी केली जात आहे. यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन शेतकऱ्यांना काय दिलासा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील शेतकरी याकडे आता लक्ष देऊन आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन आत्महत्या देखील केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –