आज ‘या’ जिल्ह्यांत पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई – अवघ्या महाराष्ट्रात पावसाने मोठा जोर धरला आहे. आज रायगड, मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत इशारा दिला आहे की, मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी तुंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडू नये.

जाणून घ्या दालचीनीचे हे फायदे

तसेच सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर शुक्रवारी कमी होईल, असे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पाऊस मुसळधार होणार आहे म्हणून पुन्हा एकदा सतर्क राहण्याचा इशारा मुंबईकरांना देण्यात आला आहे. तसेच विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. गुरुवारी रायगड, मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर शुक्रवारी मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात तुरळक ते मध्यम सरी कोसळतील.

महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या ओव्याचे ‘हे’आरोग्यदायी फायदे

आरोग्यदायी लवंग खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे