परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील फळे भाजीपाला मार्केटमध्ये काल म्हणजेच ३१ जानेवारी २०२० रोजी ढोबळी मिरचीची दहा क्विंटल आवक झाली असून ढोबळी मिरचीला प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले आहे.कोथिंबिरीची १२५ क्विंटल आवक झाली.प्रतिक्विंटलला ४०० ते १२०० रुपये दर मिळाले.कारल्याची ६ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले.
परभणीत गाजर ८०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल
शेपूची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ८०० ते १२०० रुपये दर मिळाले. मेथीच्या १५ हजार जुड्यांची आवक झाली. प्रति शेकड्याला ४०० ते ६०० रुपये दर मिळाले.काकडीची ५० क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ६००० ते ८००० रुपये दर मिळाले. गवारीची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५००० ते ७००० रुपये दर मिळाले.
खानदेशात लाल कांद्याची आवक वाढली
वांग्यांची ३० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची १३०० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेटला ८० ते १५० रुपये दर मिळाले.हिरव्या मिरचीची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३५०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ७० क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. कोबीची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४०० ते ६०० रुपये मिळाले.
मुंबईसह राज्यभरात गारठा कायम https://t.co/TslVEeQaap
— KrushiNama (@krushinama) February 1, 2020