खानदेशात लाल कांद्याची आवक वाढली

खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक काहीशी वाढली असून, दर प्रतिक्विंटल २५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. आवक मागील चार ते पाच दिवसांत वाढल्याची माहिती मिळाली. कांद्याची आवक धुळे, पिंपळनेर , साक्री, जळगाव, चाळीसगाव, अडावद , किनगाव या बाजार समित्यांमध्ये होत आहे. आवक मागील सात- आठ दिवसांत काहीशी वाढली असून, जळगाव बाजार समितीत मागील आठवड्यात प्रतिदिन ८०० क्विंटलपर्यंतची आवक झाली.

मोठी बातमी ; शेणखताच्या दारात वाढ

दर्जेदार कांद्याला मागील आठवड्यात किमान २५०० व कमाल ५००० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. दरात चढउतार झाले. परंतु, दर पाच हजार रुपयांखाली आलेले नसल्याची माहिती मिळाली. अडावद व धुळे येथील बाजारातही मागील आठवड्यात प्रतिदिन सरासरी ४०० क्विंटल कांद्याची आवक झाली. आवक जळगाव, औरंगाबाद, जालना, धुळे, साक्री, शिरपूर या भागांतून होत आहे.

धक्कादायक बातमी ! कांदा पिकाचे पंचनाम्यांचे आदेश नाहीत

धुळे, शिरपूर, शहादा, चोपडा तालुक्‍यातील काही शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याची पाठवणूक इंदूर व बडवानीच्या बाजारात केली. तेथे कांद्याला प्रतिक्विंटल साडेआठ हजार रुपयांपर्यंतचे दर मिळाले. कांद्याची आवक आणखी १० ते १२ दिवस टिकून राहण्याचे संकेत आहेत. काही खरेदीदारांनी थेट शेतातून कांद्याची खरेदी केली.