मुंबई – मालीचे वाणिज्यदूत विकास मित्तरसेन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कृषि मंत्री दादाजी भुसे यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी कृषि विभागाचे सहसचिव सुशील खोडवेकर उपस्थित होते.
निर्यातक्षम मालाचे उत्पादन करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा
राज्यात निर्यातक्षम कृषिमालाचे उत्पादन कसे करता येईल याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषि विभागाची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणार असल्याचे सांगून कृषिमंत्री श्री.भुसे यांनी आगामी काळात कृषिमाल उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांची एक परिषद आयोजित करण्यात येईल, अशी माहितीही दिली.
दर्जेदार हळद उत्पादनावर भर
राज्यात दर्जेदार हळदीचे उत्पादन करण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचविण्यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार असल्याची माहितीही कृषिमंत्री श्री.भुसे यांनी दिली.
कृषि माल प्रक्रिया, शीतगृह उभारणी आणि कृषि मालाची निर्यात या बाबींवर दोन्ही बाजूच्या मान्यवरांनी आपापल्या भागातील माहितीची देवाणघेवाण केली.
महत्वाच्या बातम्या –
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये दोन दिवस वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
- सावधान! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
- मान्सूनचा परतीचा प्रवास ‘या’ दिवसापासून सुरु होणार; हवामान खात्याचा अंदाज
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
- राज्यातील या जिल्ह्यांमध्ये आज वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता