‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ

पुणे – राज्यात गेल्या 24 तासांत 41 हजार 327  नवे कोरोनाबाधितांची (Corona) नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात गेल्या २४ तासात 29 रुग्णांनी कोरोनामुळे (Corona) जीव गमावला आहे.  तर राज्यात गेल्या २४ तासात 40 हजार 386 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर राज्यात रविवारी 8 ओमिक्रॉनबाधितांची नोंद झालीय.

पुण्यात कोरोनाने (Corona) कहर माजविला आहे. गेल्या २४ तासांत कोरोना 10 हजार 102 रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरातील 5 हजार 375 जण आहेत. रविवारी 5 हजार 405 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर जिल्ह्यात गेल्या २४ तासात ८ मृत्यू झाला आहे. शनिवारी जिल्ह्यात 10 हजार 281 नवे कोरोना रुग्ण तर शुक्रवारी नवे रुग्ण सापडण्याचा आकडा 10 हजार 76 इतका होता. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या निम्‍याहून कमी आहे.

महत्वाच्या बातम्या –